भारताचे माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने राजकारणातील अजताशत्रू ; सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणारेकविमनाचे सर्वसमावेशक महान नेतृत्व हरपले आहे.अश्या शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहिली आहे.
राजकारणातील सात्विक; सभ्य; कवी हृदयाचे सुसंस्कृत;प्रेरणादायी आदर्श व्यक्तीमत्वाचे अटल बिहारी वाजपेयी हे भारतीयराजकारणातील पितामह देशभक्तीचा बुलंद आवाज असणारे प्रभावी वक्ते होते. भाजप चे ज्येष्ठ नेते एवढीच त्यांची प्रतिमा नव्हती तरसर्व राजकीय पक्षात त्यांचे चाहते होते. घराघरात त्यांच्या वक्तृत्वाचे चाहते होते. सत्तेत असले तरी साधी राहणी आणि उच्च विचारअसणार्या अटलजींच्या व्यक्तिमत्वाची नेतृत्वाची कर्तृत्वाची आणि वक्तृत्वाची देशवासीयांना मोहिनी होती. अटल बिहारी वाजपेयीयांच्याशी माझे चांगले संबंध होते.त्यांच्या बद्दल मला आदर होता. ते चांगले कवी सुद्धा होते. ते एन डी ए च्या काळात प्रधानमंत्री होते.त्याकाळात आम्ही संसदेत भेटत असु. त्यांना मराठी भाषा चांगली येत होती. अनेकदा त्यांनी मला भेटल्यावर मराठी भाषेतच मला कसेआहात असे क्षेमकुशल विचारीत असत. त्यांना महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांबद्दल प्रचंड आदर वाटत होता.त्यांना अनुसूचित जातीजमाती बहुजनांच्या प्रश्नांवर सहानुभूती होती.