नवी मुंबई : ‘त्रिमुर्ती मित्र मडंळ, त्रिमुर्ती महिला मडंळ’ तसेच शिवसेना शाखा क्रमांक ८६ च्या वतीने नेरूळ सेक्टर सहा आणि सारसोळे गावातील सफाई कामगारांसाठी आयोजिलेला रक्षाबंधनांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
गेल्या ५ वर्षापासुन विभागात साफसफाई कर्मचारी यांच्यासाठी सकाळीच ६ वाजता रक्षांबधनाचा हा आगळा वेगळ्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मडंळाच्या अध्यक्षा संगिता दिलीप आमले, उपाध्यक्षा छाया भोस, सचिव सुप्रिया कोले, खजिनदार सुमन पाटील, सविता यादव, आरती कोले तसेच सदस्या यांच्या वतीने व शिवसेना शाखाप्रमुख दिलिप आमले यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमात शिवसेनेच्या महिला शहर संघठक सौ. रोहीणी भोईर, शिवसेनेच्या नगरसेविका सुनिता रतन मांडवे, शिवसेनेचे विभागप्रमुख व माजी नगरसेवक रतन मांडवे प्रमुख पाहूणे म्हणून सहभागी झाले होते. यावेळी कार्यक्रमाच्या आयोजक महिलांनी परिसरात स्वच्छतेचे काम करणाऱ्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांना औक्षण करून राख्या बांधल्या. यावेळी उपस्थित पाहूण्यांनी या कार्यक्रमाची प्रशंसा करताना या कार्यक्रमातून आपल्या बहिणी राहत असलेल्या परिसरात स्वच्छता राखण्याची जबाबदारी आता सफाई कामगाररूपी या भावांवर आहे. स्वच्छतेच्या माध्यमातून हे भाऊ खऱ्या अर्थाने आपल्या बहीणीचे व तिच्या परिवाराचे रक्षण करत असल्याचे शिवसेना नगरसेविका सुनिता रतन मांडवे यांनी यावेळी आपल्या भाषणातून सांगितले.