सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : केरळ राज्य महापुराने पूर्णपणे उध्वस्त झालेले असताना नवी मुंबईकर जनतेने मनसेच्या केरळ मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध जीवनावश्यक वस्तूंची भरघोस मदत केली. विविध सामान भरलेले टेम्पो नवी मुंबई मनसेने वाशी येथील केरळ भवनला सुपूर्द केला.
नवी मुंबईकर जनतेने व मनसे पदाधिकाऱ्यांनी तांदूळ, डाळी, मसाले, चहा, रवा, लहान बाळांचे खाद्य, सुके खाद्यपदार्थ, बिस्किटे, लहान मुलांचे कपडे, बेडशीट, चादर, साड्या, चप्पल, टॉवेल, सॅनिटरी नॅपकिंस, बेबी डायपर, पाणी स्वच्छ करण्याच्या गोळ्या, औषधे, सोलर दिवे, टॉर्च, साबण, टूथपेस्ट, शाम्पू इत्यादी वस्तू जमा करून केरळपूरग्रस्तांना मदत म्हणून देण्यात आली.
मागील आठवड्याभरापासून नवी मुंबईतील मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नवी मुंबईकर जनतेमध्ये जाऊन केरळपूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले होते. नवी मुंबईतील विविध भागांमधून जनतेने स्वखुशीने केरळ पूरग्रस्तांना मदत म्हणून त्यांच्या परीने शक्य ती मदत नवी मुंबईच्या मनसे पदाधिकाऱ्यांकडे पोहोचवली व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी नवी मुंबईकर जनतेचे सढळ हस्ते केलेल्या मदतीबद्दल त्यांचे आभार मानले. हा मदतीचा ओघ केरळची परिस्थिती पूर्वपदावर येई पर्यंत सुरु ठेवण्याचे आवाहन नवी मुंबई मनसेने नवी मुंबईकरांना केले आहे. या मदत कार्यात नवी मुंबई मनसे शहर कमिटी, विद्यार्थी सेना, महिला सेना, वाहतूक सेना, चित्रपट सेना, मनपा कामगार सेना, विभाग, उपविभाग, शाखा अध्यक्ष व नवी मुंबईतील महाराष्ट्रसैनिकांनी सक्रीय सहभाग घेतला.