सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : महापालिकेत काम करणार्या मूषक नियत्रंण कामगारांची ससेहोलपट थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. ऑगस्ट महिना संपत आला तरी मूषक नियत्रंणच्या कामगारांना अजून जुलै महिन्याचा पगार या कामगारांना अजून मिळालेला नाही.
मूषक नियत्रंण विभागात ५० कामगार काम करत आहे. मनी नावाच्या ठेकेदाराच्या माध्यमातून पालिका प्रशासनदरबारी हे कामगार काम करत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून या कामगारांची आर्थिक ससेहोलपट सुरू असून या कामगारांना वेतन कधीही वेळेवर मिळत नाही. दोन ते तीन महिन्याच्या विलंबानेच वेतन नेहमी देण्यात येते.
कामगारांना घरभाडे, मुलांचे शिक्षण, घरखर्च आदी भागविताना नाकीनऊ येत आहे. नुकताच रक्षाबंधनचा सणही या कामगारांना रिकाम्या हातानेच साजरा करावा लागला. गेल्या अनेक वर्षापासून वेतन विलंबामुळे मूषक नियत्रंणच्या कामगारांना कर्ज काढूनच संसार करावा लागत आहे. अनेकदा या कामगारांना उंदिर पकडण्यासाठी बॅटरी, काठी व अन्य साहीत्याही स्वत:च्या खर्चानेच खरेदी करावे लागत आहे. अनेक वर्षे या कामगारांना अवघ्या ५ हजार रूपये वेतनावर काम करावे लागत होते. याप्रकरणी आमदार संदीप नाईकांनी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करुन त्यांना अन्य विभागातील कंत्राटी कामगारांप्रमाणे वेतन देण्यास भाग पाडले आहे. महापालिकेतील नगरसेवकही आपल्या वेतन विलंबाबाबत पालिका प्रशासनाला धारेवर धरत नसल्याची नाराजी या कामगारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी सातत्याने आपल्या कमी वेतनाबाबत पाठपुरावा करणे, वेतन विलंबाबाबत पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला असल्याची माहिती मूषक नियत्रंणच्या कामगारांकडून देण्यात येत आहे. गुरूवारी रात्री सोशल मिडीयाच्या माध्यमातून पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी बेलापुरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्याकडे या कामगारांची कैफीयत मांडली असता त्यांनी या समस्येचा पालिका प्रशासनाकडून निवारण करण्याचे आश्वासन दिले आहे. याप्रकरणी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्यामुळे मूषक नियत्रंण कामगारांमध्ये उत्साह संचारला असून आपल्या समस्येचे कायमस्वरूपी निवारण होणार असल्याचा आशावाद व्यक्त केला जात आहे.