सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : नेरूळ नोडमध्ये उच्चशिक्षित नगरसेविका म्हणून ओळखल्या जाणार्या सौ. सुजाता सुरज पाटील यांनी अल्पावधीतच आपल्या कामाने एक वेगळा ठसा निर्माण केला आहे. एक अविकसित व बकाल भागाचा कायापालट करण्याचे शिवधनुष्य सक्षमपणे पेलताना त्यांनी सारसोळे गावातील खुल्या. उघड्यावर असणार्या विद्युत भूमिगत करण्याच्या कामाला चालना दिल्यामुळे स्थानिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
एप्रिल २०१५ साली झालेल्या महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणूकीत प्रभाग ८५ मधून सारसोळे, कुकशेत व नेरूळ सेक्टर सहा परिसरातून विक्रमी मताधिक्याने सौ. सुजाता सुरज पाटील विजयी झाल्या. वाणिज्य शाखेच्या द्विपदवीधर असलेल्या सुजाता पाटील यांच्यावर सुशिक्षित मतदारांनी विश्वास दाखविला.
तुकाराम मुंढेपर्वामुळे नवी मुंबईच्या विकासकामामध्ये अडथळे निर्माण झाल्यावर जे अन्य प्रभागामध्ये चित्र निमार्र्ण झाले, ते चित्र काही प्रमाणात सुजाताताईंच्याही प्रभागात निर्माण झाले. राजकारणात शिकलेली माणसे आल्यावर परिसराचा कायापालट होतो, हे सुजाता पाटलांनी उक्तीने नव्हे तर कृतीतून दाखवून दिले. अन्य नगरसेविकांसारखे सेल्फी काढणे, सोशल मिडीयातून कामाची मार्केटींग करणे सुजाता पाटलांना जमले नसले तरी मुंढे गेल्यानंतर त्यांनी काही करोडोंचा निधी आणून परिसराचा कायापालट करण्याचा धडाका लावला आहे.
निवडून आल्यावर सुजाता पाटलांनी पालिका अधिकार्यांसमवेत परिसराचे व्हिडिओ चित्रीकरण करून ठेवले आहे. मतदारांनी आपल्याला कोणता परिसर ताब्यात दिला होता आणि पाच वर्षांनी आपण मतदारांना कोणता परिसर देणार आहोत, याचा हा पुरावा असणार आहे. सारसोळे गाव हे नवी मुंबई नोडमधील अविकसित गावच. या गावाच्या बकालपणामध्ये पालिका अधिकार्यांचा व ठेकेदारांचाच प्रामुख्याने हातभार लागलेला आहे. निवडून आल्यावर दौरा करताना गावातील गटारांवर २००२-२००४ची झाकणे असल्याचे सुजाता पाटलांच्या निदर्शनास आले. सारसोळे गावातील मासळी मार्केटच्या अस्वच्छतेमुळे, बकालपणामुळे सुजाता पाटलांना किरकोळ अपघाताचाही सामना करावा लागला. सारसोळे गावाचा फेरफटका मारला असता गटारावर, अर्ंतगत रस्त्यावर, नाक्यावर, चौकात विद्युत वायरी, केबल्स, मोठ्या आकाराच्या केबल्स लटकलेल्या तसेच विखुरलेल्या पहावयास मिळाल्या. सुजाता पाटील या उच्चशिक्षित असल्याने त्यांनी प्रत्येक समस्येची नोटींग करून ठेवलेले आहे. त्या समस्येचा पाठपुरावा करतात व समस्येचे निवारण झाल्याशिवाय स्वस्थ बसत नाहीत. विशेष म्हणजे काम होत असताना त्या फोटोसेशनही करत नसल्याने जनतेमध्ये त्यांच्याविषयी एक आदराची भूमिका निर्माण झालेली आहे. विद्युत वायरी व केबल्स आता भूमिगत होवू लागल्याने सारसोळेकरांच्या जिवितावर असणारी टांगती तलवार आता दूर झाल्याचे समाधान स्थानिकांकडून व्यक्त केले जावू लागले आहे.