सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामध्ये सिडकोच्या जागेवर महापालिकेने बांधलेले मार्केट तोडण्याची नामुष्की महापालिकेवर आली. करदात्या नवी मुंबईकरांचे सुमारे २२ ते २५ लाख पाण्यात गेले. त्यामुळे याप्रकरणी दोषी असलेल्या महापालिका अधिकार्यांवर प्रशासकीय कारवाई करून मार्केटसाठी पाण्यात गेलेला लाखो रूपये खर्च संबंधितांकडून वसूल करण्याची मागणी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त डॉ. रामास्मानी आणि महापौर जयवंत सुतार यांच्याकडे मंगळवारी (दि. ४ सप्टेंबर) लेखी निवेदनातून केली आहे. यापूर्वी खांडगेपाटील यांनी १८ ऑगस्ट २०१८ रोजी महापालिका आयुक्तांकडेे याच संदर्भात लेखी मागणी केली होती..
नेरूळ सेक्टर सहामध्ये महापालिका प्रशासनाने सिडकोने मार्केटसाठी आरक्षित ठेवलेल्या भुखंडावर मार्केट बांधले. या मार्केटकरिता महापालिका प्रशासनाचे अंदाजे २२ ते २५ लाख रूपये खर्च झाले आहेत. मार्केटसाठी आरक्षित असलेल्या भुखंडाचे सिडकोकडून महापालिकेकडून हस्तांतर होणेपूर्वीच मार्केट बांधल्याने हे मार्केट अनधिकृत ठरले व या अनधिकृत मार्केटवर स्वत:च हातोडा चालविण्याची व मार्केट पाडण्याची नामुष्की प्रथमच महापालिका प्रशासनावर आली. या अनागोंदी कारभारामुळे महापालिका प्रशासनाचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. हा पैसा सर्वसामान्य करदात्या नवी मुंबईकरांचा आहे. सिडकोकडून भुखंड हस्तांतरीत न होताच त्यावर मार्केट का बांधण्यात आले व त्या जागेवर २२ ते २५ लाख रूपये महापालिका प्रशासनाचे खर्च झाले. ते मार्केट अनधिकृत ठरले व महापालिकेला ते मार्केट पाडावे लागले. महापालिकेच्या ज्या ज्या अधिकार्यांनी हा निर्णय घेवून कार्यवाही केली, त्या सर्व अधिकार्यांवर प्रशासकीय कारवाई करून मार्केटवर झालेला खर्च संबंधितांकडून लवकरात लवकर वसूल करण्यात यावा आणि याबाबत महापालिका प्रशासनाने काय कारवाई केली याचा लेखी अहवाल आम्हास प्राप्त करून द्यावा, अशी मागणी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संदीप खांडगेपाटील यांनी केली आहे. यापूर्वी मार्केटचा खर्च पालिका अधिकार्यांकडून वसूल करण्याची मागणी खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे व महापौरांकडे केली आहे.