सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गावातील मल:निस्सारण वाहिन्यांच्या झाकणांचा (चेम्बर्स) विषय नवी मुंबई सोडून मंत्रालय स्तरावर पोहोचल्याने व पाहणी अभियानात महापालिकेऐवजी ठेकेदारांने पुढाकार घेतल्यामुळे हा विषय महापालिकेवर शेकणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. नेरूळ सेक्टर सहा आणि सारसोळे गावातील मल:निस्सारण वाहिन्याच्या चेम्बर्स(झाकणांची) इन कॅमेरा मोजणी करण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांची महापौर व आयुक्तांकडे ४ सप्टेंबर रोजी महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी आणि महापौर जयवंत सुतार यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गावातील मल:निस्सारण वाहिन्यांच्या चेम्बर्सची (झाकणांची) यादी पालिका ‘ब’ प्रभाग समिती सदस्य मनोज मेहेर यांना महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. त्या यादीनुसार आम्ही मनोज मेहेर यांच्यासमवेत गावात व नेरूळ सेक्टर सहा परिसरात मल:निस्सारण वाहिन्यांच्या (झाकणांची) तपासणी केली असता, यादीनुसार कोठेही झाकणे पहावयास मिळाली नाही. उलटपक्षी पालिका प्रशासनाने दिलेल्या यादीपेक्षाही कमी झाकणे निदर्शनास आली. पालिका प्रशासनाकडून दिलेल्या यादीमध्ये सेक्टर सहा व सारसोळे गावातील काही भागांचा उल्लेखही नसल्याचे संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनातून महापौर व आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे.
६ ऑगस्ट २०१८ रोजी महापालिका प्रशासनाकडून सांयकाळी मल:निस्सारणच्या चेम्बर्सची (झाकणांची) मोजणी करण्यात आली. मनोज मेहेर महापालिका प्रभाग समिती सदस्य असल्याने या चेम्बर्सच्या (झाकणांच्या) मोजणीची मागणी आपणाकडे करत होते. अशा वेळी प्रशासन व त्यांच्यात हा पत्रव्यवहार असताना मोजणीच्या वेळी भलताच आणि गलथान स्वरूपाचा प्रकार स्थानिक रहीवाशांना अनुभवयास आला. पालिका प्रशासनाच्या कर्मचारी व अधिकार्यांऐवजी ठेकेदार व ठेकेदारांचीच माणसे या मोजणी अभियानात पुढाकार घेत होती. मनोज मेहेर यांनी मोजणी अभियानाविषयी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत असताना या अभियानात ठेकेदार व त्यांच्या माणसांचा सहभाग कशासाठी करण्यात आला? पालिका प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचार्यांना चेम्बर्सची (झाकणांची) माहिती नाही काय? ठेकेदाराला कामाची बिले देताना महापालिका प्रशासनाकडून चेम्बर्सची (झाकणांची) पाहणी व मोजणी केली जात नाही काय? पालिका प्र्रशासनाकडून राबविण्यात आलेल्या मल:निस्सारणच्या चेम्बर्सच्या (झाकणांच्या) अभियानात ठेकेदार व त्यांच्या कमर्र्चार्यांना सहभागी का करून घेण्यात आले याची लेखी माहिती देण्यात यावी यासाठी मनोज मेहेर सतत पाठपुरावा करत असताना याकडे कानाडोळा करण्यात येत आहे. याचा अर्थ न समजण्याइतपत प्रभाग ८५ व ८६ मधील सारसोळे व कुकशेत गावचे ग्रामस्थ आणि नेरूळ सेक्टर सहाचे रहीवाशी अज्ञानी नक्कीच नाहीत. या अभियानावेळी ठेकेदारांच्या माणसांकडून अरेरावी व शिवराळ भाषाही मनोज मेहेर यांना वापरण्यात आली. अभियान हा प्रशासनाचा भाग असताना ठेकेदार व त्यांच्या माणसांनी वापरलेली असंसदीय भाषा व पदाचा गैरवापर करत असल्याचा आरोप यामुळे नजीकच्या काळात मनोज मेहेर अथवा त्यांच्या परिवारावर काही जिवित संकट निर्माण झाल्यास ठेकेदार , त्याचे कर्मचारी, अधिकारी आणि महापालिका प्रशासनाचा मल:निस्सारण विभाग जबाबदार राहणार असल्याचा इशारा संदीप खांडगेपाटील यांनी दिला आहे.
जे पाहणी अभियान राबविले, ते कागदोपत्री माहितीमध्ये उल्लेख असल्याप्रमाणे राबविण्यात आलेले नाही. जे पाहणी अभियान राबविण्यात आले, त्या परिसराची व त्या त्या परिसरात असलेल्या मल:निस्सारणच्या चेम्बर्स (झाकणांच्या)च्या आकडेवारीसह सविस्तर माहिती हवी आता आम्हा करदात्या नागरिकांना हवी आहे. मोघम उत्तर नको.
पाहणी अभियान करताना अनेक मल:निस्सारणच्या चेम्बर्सवर (झाकणांवर) डांबर व मातीचा थर पहावयास मिळाला. मल:निस्सारणच्या चेम्बर्सची सफाई करताना झाकणे उघडली जातात. त्यातील मल स्वरूपातील कचरा बाहेर काढला जातो. त्यामुळे सफाई अभियान करताना प्रत्येक चेम्बर्सच्या सफाईचा फोटो रिडींग आम्हाला हवा आहे. प्रभाग समितीच्या बैठकीत याबाबत मनोज मेहेर यांनी वारंवार मागणी केलेली आहे. तरी आता रहीवाशी या नात्याने आम्हालाही मल:निस्सारणच्या चेम्बर्सची (झाकणांची) फोटो रिडींग तारीखवार हवी आहे. पावसाळीपूर्व कामामध्ये कधी व कोणत्या चेम्बर्सची सफाई झाली आहे, याची माहिती सारसोळे गावातील ग्रामस्थांना आणि नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशांना प्राप्त होणे आवश्यक असल्याचे संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
मल:निस्सारणच्या चेम्बर्सची (झाकणांची) सफाई झाली असती तर त्या चेम्बर्सवर डांबर व मातीचे ढिगारे कसे याचे उत्तर आम्हाला पालिका प्रशासनाकडून हवे आहे. आम्ही आपणास पुन्हा वारंवार सांगत आहोत की आमचा व ठेकदाराचा काही संबंध नाही. आम्हाला प्रशासनाकडून उत्तर अपेक्षित आहे. चेम्बर्सची सफाई झाली असती तर आजूबाजूला राहणार्या लोकांना नक्कीच चेम्बर्समधून निघणार्या मल: या कचर्याच्या दुर्गंधीचा सामना करावा लागला असता. या पाहणी अभियानावेळी उपस्थित पालिका कर्मचार्यांसमोर परिसरातील रहीवाशांकडे विचारणा केली असता, त्यांनी चेम्बर्सची सफाई झालीच नसल्याचे उत्तर महापालिका कर्मचार्यांसमोरच सांगितलेले आम्ही व आमच्या मित्रांनी स्वत: पाहिले असल्याचे संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
आपण मनोज मेहेर यांना दिलेल्या यादीनुसार मल:निस्सारणच्या चेम्बर्सची (झाकणांची) मोजणी अभियान आम्हाला अपेक्षित आहे. जे अभियान झाले त्यात ठेकेदार व त्याच्या माणसांच्या माध्यमातून झाले. एक प्रकारे ते अभियान ठेकेदार धार्जिणे व ‘हायजॅक’ केल्यासारखे होते. पालिका प्रभाग समिती सदस्यांना ठेकेदार व त्याच्या कर्मचार्यांना या अभियानाच्या वेळी एक दहशतीच्या वातावरणाचा सामना करावा लागला, तर सर्वसामान्य माणसांनी तक्रारीचा पाठपुरावा केल्यास त्याला किती गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागेल याची कल्पनाही करवत नाही. आम्हाला आता आपण मनोज मेहेर यांना दिलेल्या मलनिस्सारणच्या चेम्बर्सची (झाकणांची) मोजणी अभियान ‘इन कॅमेरा’ हवी आहे. त्याचा सर्व खर्च आम्ही देण्यास तयार आहोत. कारण जेणेकरून सारसोळेच्या ग्रामस्थांना आणि नेरूळ सेक्टर सहाच्या रहीवाशांना सत्य परिस्थिती समजणे आवश्यक असल्याचे संदीप खांडगेपाटील यांनी म्हटले आहे.
आपणाकडून आम्हाला १) पाहणी अभियानाच्या वेळी ठेकेदार व त्याचे कर्मचारी का उपस्थित होते, त्यांनीच या अभियानाचे संचलन का केले याबाबत लेखी माहिती हवी आहे. त्यांनी वापरलेल्या शिवराळ भाषेला, अरेरावी आणि आरोपांची जबाबदारी कोणाची आहे, याचाही खुलासा हवा आहे. मनोज मेहेर हे प्रभाग समिती सदस्य नसताना सर्वसामान्य रहीवाशी या नात्याने मागील पाच वर्षात सारसोळे गावासाठी आणि नेरूळ सेक्टर सहाच्या विकासासाठी महापालिका, मंत्रालय, सिडको, पोलीस मुख्यालय आणि पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात सात हजाराहून अधिक लेखी तक्रार पत्र त्यांनी सादर केलेली आहे. पद असो वा नसो, त्यांना मला लोकांची कामे करताना पदाची कधी गरज भासली नाही. २) ६ ऑगस्ट रोजी झालेल्या अभियानाची लवकरात सत्य माहिती परिसर व त्यातील चेम्बर्सची आकडेवारी अशा स्वरूपात हवी आहे. मोघम उत्तर नको. जी मोजणी झाली, त्याची यादी ठेकेदाराची माणसे व पालिकेची माणसे आणि मनोज मेहेर आणि आम्ही स्थानिक रहीवाशी करत होतो. ३) मागील पाहणी अभियान ठेकेदारधार्जिणे व हायजॅक स्वरूपाचे असल्याने पुनश्च पाहणी अभियान ‘इन कॅमेरा’ आवश्यक आहे. त्याचा खर्च देण्यास बांधिल आहे. या अभियानात ठेकेदार व संबंधितांची माणसे नको, असे निवेदनाच्या शेवटी संदीप खांडगेपाटील यांनी म्हटले आहे.