नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्रातील 23 विसर्जन स्थळांवर श्रीगणेशमुर्तींच्या विसर्जनाकरीता तराफ्यांची व मोठ्या आकाराच्या मुर्तींची अधिक संख्या लक्षात घेऊन फोर्कलिफ्टची व्यवस्था करण्यात आली होती. सुरक्षेच्या दृष्टीने काठांवर बांबूचे बॅरॅकेटींग तसेच पुरेशा विद्युत व्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली होती. त्याचप्रमाणे भाविकांसाठी पिण्याचे पाणी व प्रथमोपचारासह वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती. विसर्जनासाठी आलेल्या श्रीगणेश मुर्तींची निरोपाची आरती व पुजन करण्याकरीता सर्व विसर्जन स्थळांवर टेबलची मांडणी करण्यात आलेली होती. श्रीमूर्तींच्या विसर्जनासाठी विसर्जनस्थळांवर 750 हून अधिक स्वयंसेवक, अग्निशमन जवान, लाईफ गार्डस् तैनात होते. शहरातील मुख्य 14 तलावांमध्ये गॅबियन वॉल पध्दतीच्या रचनेव्दारे निर्माण केलेल्या विशिष्ट जागेत भाविक भक्तांनी व मंडळांनी श्रीगणेशमुर्तीचे विसर्जन करून पर्यावरण जपणुकीच्या दृष्टीने महानगरपालिकेस अनमोल सहकार्य दिले.
गणेश विसर्जन सोहळ्यात जिंगलव्दारे नवी मुंबई शहर स्वच्छतेचा प्रचार
स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये नवी मुंबईचे शहर स्वच्छतेमध्ये असेलेले देशातील मानांकन उंचाविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली असून ‘नवी मुंबई चमकवूया’ ही सर्व विसर्जन स्थळांवर तसेच वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वारंवार प्रसारीत केली जाणारी स्वच्छतेची नवी जिंगल लक्षवेधी ठरली. साध्या सोप्या शब्दात, मनाला भावणा-या सुरेल संगीतासह साकारलेल्या या स्वच्छतेच्या नव्या जिंगलला नागरिकांचा उत्साहजनक प्रतिसाद मिळाला. स्वच्छ नवी मुंबई मिशनचे महानगरपालिकेचे ब्रॅंड ॲम्बेसेडर सुप्रसिध्द गायक – संगीतकार श्री. शंकर महादेवन यांनी मागील वर्षी केलेल्या जिंगललाही नागरिकांची पसंतीची दाद मिळाली होती. वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही जिंगल वाजत असताना आपल्या घरातील श्रीमूर्ती विसर्जन स्थळाकडे घेऊन जाताना श्री. शंकर महादेवन यांनी हात उंचावून चौकात उपस्थित नवी मुंबईकरांना अभिवादन केले.
अभिनव प्रयोगातून 66.5 टन निर्माल्य जमा
श्रीमुर्तींसोबत विसर्जनस्थळी येणा-या पुष्पमाळा, फुले, दुर्वा, तुळस,
कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण पोलीस यंत्रणा दक्षतेने कार्यरत होती. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये श्रीगणेशविसर्जन पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधिकारी – कर्मचारी व स्वयंसेवक दक्षतेने कार्यरत होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकाप्रमाणेच महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयांच्या माध्यमातून त्या त्या विसर्जनस्थळांवर व्यासपीठ उभारण्यात आले होते तसेच त्याठिकाणीही ध्वनीक्षेपकाद्वारे श्रीगणेशभक्तांचे स्वागत करण्यात येऊन त्यांना विसर्जनाच्या दृष्टीने मौलिक सूचना देण्यात येत होत्या. संपूर्ण महापालिका क्षेत्रात नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुनियोजित व्यवस्थापन करण्यात आल्याने विसर्जनसोहळा सुव्यवस्थित रितीने संपन्न झाला.