पनवेल : पालघर जिल्ह्यातील खारोंदा गावांमध्ये प्रचंड पाऊस होतो, मात्र वर्षातील 8 ते 9 महिने येथे पाण्याचे दुर्भिक्ष असते. गावामध्ये पाणी साठवण्याची सुविधा नसल्याने असे घडते. परिणामी, गावकऱ्यांना या कालावधीमध्ये स्थलांतर करण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे त्यांच्यापुढे समस्या निर्माण होतात.
पाणी हा जीवनातील मूलभूत घटक असल्याने, पालघर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या गॅलेक्सी सर्फेक्टंट्स लिमिटेडचे लक्ष या समस्येकडे वेधले गेले. पाण्याच्या बाबतीत सकारात्मक कंपनी बनणे, हे गॅलेक्सी सर्फेक्टंट्स लिमिटेडचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करणे व आपल्या कारखान्यांमध्ये पाण्याच्या बचतीचे प्रकल्प चालवणे, याबरोबरच सीएसआर उपक्रमांनी सर्व लक्ष या उद्दिष्टांवर केंद्रित केले.
खारोंदा गावांतील समस्यांकडे गॅलेक्सी टीमचे लक्ष वेधले गेले. चेकडॅम बांधल्यास या गावांच्या समस्या सुटू शकतात, असे त्यांना वाटले. स्थानिक रहिवाशांबरोबर काम करण्यासाठी एक टीम तयार करण्यात आली आणि यासाठी आवश्यक असलली जमीन बाबाजी सोनया रावते व नंदू नवशा नाडगे या दोन शेतकऱ्यांनी उदारपणे दिली. नियोजन तयार करण्यात आले आणि कंपनीच्या इंजिनीअरनी दोन चेकडॅम बांधण्यासाठी पूर्णपणे सहभाग घेतला. पहिल्या प्रकल्पामध्ये, नवल्याचापाडा येथे चेकडॅम बांधण्यात आला व या चेकडॅममुळे २० लाख लिटर पाणी साठवण्यासाठी मदत झाली. या प्रकल्पातून अनुभव घेत, खारोंदा गावांमध्ये काम करण्याच्या हेतूने गॅलेक्सीमध्ये एक टीम तयार करण्यात आली. दुसऱ्या प्रकल्पाचा आकार पाच पटीने अधिक होता व त्यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज होती.०१ कोटी १५ हजार लिटर इतक पाणी साठवण्याची क्षमता असलेल्या या दुसऱ्या चेकडॅमचे बांधकाम विक्रमी वेळेत यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले. गॅलेक्सी सर्फेक्टंट्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक यू. शेखर यांनी या दुसऱ्या चेकडॅमचे उद्घाटन केले. या चेकडॅममुळे ५३० हून अधिक कुटुंबे व अडीच हजारपेक्षा जास्त व्यक्ती यांच्या जीवनात परिवर्तन येणार आहे. या व्यक्तींना आता जगण्यासाठी व रोजगार मिळवण्यासाठी स्थलांतर करावे लागणार नाही.
यू. शेखर यांनी सांगितले, “आम्ही ज्या पर्यावरणात व समाजात राहतो तो आमच्या अस्तित्वाचा पाया आहे, असे गॅलेक्सीमध्ये आम्हाला वाटते. लोक व पृथ्वी यांच्यामध्ये सकारात्मक परिवर्तन साधण्यासाठी सीएसआर व सस्टेनेबिलिटी उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावतात. चेक डॅम बांधणे, झाडे लावणे, लोकांना शिक्षण देणे, आरोग्य व स्वच्छता या बाबतीत लोकांच्या राहणीमानात वाढ करणे आणि समाजाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे हे आमचे विविध प्रकल्प विचारात घेता; गॅलेक्सीला समाजात व पर्यावरणात सकारात्मक बदल करणे शक्य झाले आहे.”त्यांनी नमूद केले, “आम्ही उच्च दर्जाच्या सर्फेक्टंटची निर्मिती करण्यासाठी पाण्याचा वापर करतो, पण पाणी कोणीही निर्माण करू शकत नाही. परंतु, प्रत्येक जण पाण्याची बचत करू शकतो व पाणी वाचवण्यासाठी आम्हाला मदत करू शकतो.”