नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरखैरणे विभागाने ७ ऑक्टोबर रोजी माणुसकीची भिंत (नको असेल ते द्या .. हवे असेल ते घेऊन जा..), मोफत दंत चिकित्सा शिबीर, मोफत कापडी पिशवी वाटप आदी सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ झाला. यावेळी कोपरखैरणे विभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी लावून कार्यक्रमांचा लाभ घेतला. यावेळी मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी आपल्या भाषणात सत्ताधारी भाजप- शिवसेनेच्या कारभाराचे वाभाडे काढले आणि आणि कार्यक्रमाचे आयोजक शाखा अध्यक्ष चंद्रकांत डांगे, घनश्याम चौधरी विभाग अध्यक्ष लीलाधर घाग, उपविभाग अध्यक्ष सागर मांडे, समीर जाधव आणि डॉ. विशाल ढोक शाबासकी देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला उपशहरअध्यक्ष निलेश बाणखिले, उपशहरअध्यक्ष नितीन चव्हाण, शहरसचिव सचिन आचरे, शहरसचिव रुपेश कदम, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना चिटणीस अभिजित देसाई, विद्यार्थी उपशहरअध्यक्ष सनप्रीत तुर्मेकर , सह शहर सचिव शरद डिगे,वाहतूक सेना चिटणीस जमीर पटेल, वाहतुक सेना शहर संघटक महेश कदम आदी उपस्थित होते. विभाग अध्यक्ष सुधीर पाटील, अरुण पवार, शीतल मोरे, उपविभाग अध्यक्ष प्रसाद घोरपडे, दत्तात्रय तोडकर, अमर गुळंबे, शिवम कवडे, तुषार कचरे, अक्षय कदम, शाखा अध्यक्ष पंढरीनाथ साळेकर, तुषार कोंढाळकर, विद्यार्थी सेना विभाग अध्यक्ष सचिन गोळे, उपविभाग अध्यक्ष शरद जाधव, अमर मांढरे, योगेश गोळे, विकास भिलारे, उत्तम जोगले, जयदीप गायकवाड, महाराष्ट्र सैनिक राहुल बांदल, स्वप्नील पाटील, संकेत जांभळे, संतोष मोरे, सिद्धेश, केतन कदम, उमेश कोडक, नितीन तुपे, बंडोपंत माटल, धोंडीराम पाटील, पांडुरंग पडावे, नवनाथ हावरे, दीपक पाटील, अनिल भोसले , सागर नाईकरे, अभिजित कोळेकर, अक्षय दिघे, अमित कळमकर, मयुरेश पारखी , अविनाश नवघणे सौ. स्वाती बागडे, सौ. डांगे, अश्विनी केदारी, विद्या पानसरे, सौ. काळे, सौ.अपर्णा बागुल तसेच जेष्ठ नागरिक श्रीपाद दुधवाडकर, प्रणील सोनावणे, नागनाथ सोनार, सुरेश जगताप,मारुती सनके यांच्यासह विभागिय नागरिक, मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.