मनसेने मानले आयुक्तांचे आभार “
नवी मुंबई : महानगर पालिका अंतर्गत येणाऱ्या १७ विभागांच्या ६५०० कामगारांचा १३ महिन्यांचा ७० कोटी पगारातील फरक बँक खात्यात जमा झाला उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या दिनांक २४/०२/२०१५ रोजीच्या अधिसुचानेनुसार किमान वेतन देण्याबाबत मा सर्वसाधारण सभेचा ठराव क्र. १२७२ दिनांक १५/०२/१७ नुसार मंजुरी देण्यात आली. व आयुक्तांचे पत्र दिनांक १२/०५/२०१७ प्रमाणे सर्व कामगारांना आपण टप्प्या टप्प्याने विभागाप्रमाणे जाहीर केली असे असूनही २७ महिन्याच्या वेतन फरकासाठी चालू आर्थिक वर्षात तरतूद करण्यात आली नव्हती त्यासाठी मनसे युनियनने दिनांक २३ फेब्रुवारी रोजी आयुक्तांकडे तरतूद करावी याकरिता मागणी केली तत्काळ या मागणीचा विचार करत आयुक्तांनी ७० कोटींची तरतूद चालू अर्थसंकल्पात करून घेतली असे असून देखील या संदर्भात मनपा प्रशासनातर्फे दिरंगाई होत होती यागोष्टीचे गांभीर्य ओळखून मनसे युनियनने सदर प्रस्ताव लवकरात लवकर महासभेत पाठवण्याकरिता अतिरीक्त आयुक्तांना घेराव घातला त्याचाच परिणाम म्हणून २४ जुलै २०१८ रोजी १३ महिन्यांचा फरक देण्यास आयुक्तांनी पाठवलेल्या प्रस्तावास महासभेने मंजुरी दिली.
मा. आयुक्तांनी ०९ ऑगस्ट रोजी सर्व कार्यकारी अभियंत्यास आदेश काढले परंतु १ महिना उलटूनही मनपा प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कार्यवाही करत नसल्या कारणाने दिनांक ११ सप्टेंबर रोजी महापलिका मुख्यालयावर मनसे युनियनने पगारातील फरक १० दिवसात मिळावा यासाठी गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली दिंडी मोर्चा काढला व आयुक्तांची भेट घेऊन त्यासंदर्भातील लेखी आश्वासन देण्याची मागणी आप्पासाहेब कोठुळे यांनी केली आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत लेखी पत्र दिले तरी देखील मनसे युनियनने यावर न थांबता सातत्याने अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा केला त्याचेच यश म्हणजे आज कामगारांच्या खात्यात फरकाची रक्कम जमा झाली
यासंदर्भात आयुक्तांनी केलेल्या सहकार्याबद्दल मनसे युनियन पदाधिकारी व कामगारांनी आयुक्तांचे आभार मानले आणि कामगारांनी मनपा मुख्यालयासमोर फटाके फोडून आनंद साजरा केला यावेळी मनसे कामगार युनियनचे नवी मुंबई अध्यक्ष आप्पासाहेब कोठुळे, कामगार सेना उपाध्यक्ष राजेश उजैनकर, कार्याध्यक्ष अमोल आयवळे, सरचिटणीस अभिजित देसाई, उपाध्यक्ष रुपेश कदम, कोषाध्यक्ष भूषण बारवे, उपाध्यक्ष राजू खाडे, चिटणीस गजानन ठेंग, सहचिटणीस संजय सुतार, युनियन संघटक सदा काकडे, सुशांत फोंडे, रमेश प-हाड, विजय राठोड व शेकडो कामगार उपस्थित होते.