शरद पवार, कुमार केतकर, राजदीप सरदेसाई यांची प्रमुख उपस्थिती
मुंबई : संदीप काळे या तरुण पत्रकाराने मु. पो. आई- संपादकांचे मातृस्मरण या पुस्तकाच्या निमित्ताने मराठीत साहित्य क्षेत्रात केलेल्या प्रयोगाची सध्या राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे. ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा येत्या२३ आक्टोबरला मुंबईत होत आहे. प्रकाशनापूर्वीच या पुस्तकाची विक्रमी नोंदणी झालीअसल्याचे ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
मु. पो.आई- संपादकांचे मातृस्मरण या पुस्तकाचे संपादन संदीप काळे यांनी केले आहे. देशातील आघाडीच्या आणि सर्वपरिचित ३० संपादकांनी आपल्या आईप्रति यापुस्तकातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ३० मधून २७ संपादकांनी पहिल्यांदाचआपल्या आईवर लिहिले असल्याचे आपल्या मनोगतात सांगितले आहे. पद्मविभूषण शरदपवार यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे. आपल्या आईच्या आठवणी आणि सर्वसंपादकांच्या लेखांवर पवार यांनी केलेले भाष्य वाचनीय झाले आहे. पवार यांनी आपल्या कारकिर्दीत प्रस्तावना लिहिलेले मु. पो. आई हे पहिलेच पुस्तक आहे.या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा येत्या २३ ऑक्टोबरला यशवंराव चव्हाण प्रतिष्ठान नरीमन पॉइंट मुंबई येथे सायंकाळी ६ वाजता आयोजित केला आहे. शरद पवार,कुमार केतकर,राजदीपसरदेसाई,श्रीराम पवार, अभिनंदन थोरात यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमासाठी असणार आहे.
राजदीप सरदेसाई, खा. कुमार केतकर, भारतकुमार राऊत, श्रीराम पवार, ज्ञानेशमहाराव, उत्तम कांबळे, राजीव खांडेकर, चंद्रमोहन पुपाला, अभिनंदन थोरात, सुरेशद्वादशीवार, मंदार फणसे, राही भिडे, मधुकर भावे, प्रवीण बर्दापूरकर, ह. मो. मराठे आदी संपादकांनी आपल्या आईला प्रभावीपणे व्यक्त केले आहे. शिवाय इंग्रजी आणि हिंदी या भाषेत मु. पो. आई हे पुस्तक कसे आणता येईल या तयारीत असल्याचे ग्रंथालीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
संदीप काळे यांनी मु. पो. आई- संपादकांचे मातृस्मरण हा एक भावस्पर्शी प्रयोग आहे. आईप्रति असलेला हा अमूल्य ठेवा प्रत्येकाच्या मनात आगळी जागा निर्माण करेल.मीदेखील पहिल्यांदाच माझ्या आईविषयी या पुस्तकात लिहिले आहे.
खा.कुमार केतकर (ज्येष्ठ पत्रकार)
माझ्या मनात आईच्या आठवणीचा मोठा खजिना होता. संदीपच्या आग्रहामुळे मला माझ्याआईवर लिहिता आले. मराठी भाषा आणि साहित्याला या पुस्तकांने सन्मानित केले आहे.
मा. खा. भारतकुमार राऊत (ज्येष्ठ पत्रकार)