पश्चिम रेल्वेच्या मार्गावर चर्चगेट ते विरार दरम्यान सर्व प्लॅटफॉर्मवर येत्या मार्चपर्यंत ५०० नवीन इंडिकेटर झळकणार आहेत. या स्थानका दरम्यान असणारे सर्व जुने इंडिकेटर बदलून त्या जागी नवीन इंडिकेटर बसवण्यात येणार आहे. पुढील वर्षी मार्चपर्यंत सुमारे चार कोटी रुपये खर्च करुन नवीन एलईडी इंडिकेटर बसवण्यात येणार आहेत. या इंडिकेटरवरील आकडे सुस्पष्ट असणार असून ते दूरवरुन देखील पाहता येतील अशा पद्धतीने ते तयार करण्यात आले आहेत.
लोकल सेवेत यापूर्वी पारंपारिक पद्धतीने दिव्यांचा वापर केला जात होता. मात्र आता त्याऐवजी एलईडीचा वापर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे प्लॅटफॉर्मवर बसवण्यात येणारे इंडिकेटर फार जुने झाले आहेत. यामध्ये सातत्याने बिघाड होत होते. याविषयी प्रवाशांनी अनेक तक्रारी देखील दाखल केल्या होत्या. त्यामुळे हे इंडिकेटर बदलून त्या जागी नव्या पद्धतीने एलईडी इंडिकेटर उत्पादित करण्यात आले आहेत.
पश्चिम रेल्वेवर सुमारे १ हजार इंडिकेटर असून त्यातील ५०० इंडिकेटर बदलले जाणार आहेत. यासाठी सुमारे ४ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून येणाऱ्या मार्च महिन्यापर्यंत हे इंडिकेटर बसवण्यात येणार आहेत. हे इंडिकेटर उत्तम पद्धतीने चालतील असे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.
जुने इंडिकेटक काढून नवीन इंडिकेटर बसवण्यात येणार आहे. हे नवीन इंडिकेटर बसवण्याची सुरुवात ‘मुंबई सेंट्रल’ पासून होणार आहे. ‘मुंबई सेंट्रल’ या स्थानकापासून हे नवीन इंडिकेटर बसवण्यात येणार आहेत. त्यानंतर सर्व स्थानकांवर त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
या इंडिकेटकरचा रंग पूर्वीच्या इंडिकेटरपेक्षा उजळ असणार आहे. त्यानुसार त्यात प्रकाशमानानुसार त्यात बदल केला जाणार आहे. तसेच पावसाळ्यात त्यात पाणी जाणार नाही याची देखील खबरदारी घेतली जाणार आहे. पादचारी पुलांवरील इंडिकेटरवरुन प्लॅलफॉर्मचे क्रमांक दिसणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना दूरवरुन देखील आकडे दिसण्यास मदत होणार आहे.