सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : सामाजिक बांधिलकीची जाणिव ठेवून गेल्या काही वर्षात सातत्याने उपेक्षितांसाठी भरीव कार्य करणाऱ्या नवी मुंबई युवा संस्थेच्या वतीने यंदाच्या दिवाळीमध्ये वंचितांचा सारथी होण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यंदाच्या दिवाळीत आदिवासी पाड्यामध्ये अनाथ मुलांना, कुष्ठरोगांने पिडीत व्यक्तींकरिता भरीव कार्य करण्याचा संकल्प या मंडळींकडून करण्यात आला आहे.
गेल्या २ वर्षापासून नवी मुंबई युवा संस्थेच्या वतीने पालघर व चिरनेर येथील अदिवासी पाडामध्ये दिवाळीनिमित्त जावून त्यांना नवी मुंबई युवा संस्थेच्या वतीने कपडे व मिठाई वाटप करण्यात आले. यंदाच्या दिवाळीत रविवार, ४ नोव्हेंबर २०१८ रोजी नेरे ,पनवेल येथे शांतिवन आश्रमा मधील कुष्ठरोग्यावर उपचार घेत असलेला व समाजापासून दूर झालेल्या व्यक्तीबरोबर दिवाळी उत्सव नवी मुंबई युवा संस्थेच्यावतीने त्यांना कपडे, मिठाई देऊन साजरा करण्यात येणार आहेत. त्याबरोबर स्वच्छ वस्ती म्हणून पुरस्कार मिळालेला नवी मुंबई मधील सी.बी .डी येथील बेलाई वस्ती मध्ये तेथील रहिवाशांसोबत नवी मुंबई युवा संस्था दिवाळी उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
आपण सुद्धा ह्या समाजाचे एक घटक आहोत, आपलं सुद्धा ह्या समाजाला काहीतरी देणं लागतो, आपल्या उत्सवामध्ये सर्वाना सहभागी करून घेणे आपले करत कर्तव्य आहे,ही भावना ठेवून नवी मुंबई युवा संस्था हा उपक्रम करत आहे
या उपक्रमात तर,मग आपणही सहभागी व्हावे असे आवाहन नवी मुंबई युवा संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. यासाठी आपल्या घरी वापरात नसलेली कपडे (साडी व पुरुष ड्रेस) संस्थेच्या कार्यकर्त्यांकडे जमा करा.तसेच २५० मिठाई विकत घेण्यासाठी आर्थिक मदत करा असेही आवाहन या संस्थेकडून करण्यात आले आहे. एक साद… सामाजिक बांधिलकीची… या ब्रीदवाक्याने प्रेरित होवून समाजकार्याला वाहून घेतलेल्या मंडळींच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी नवी मुंबईकरांचेही योगदान आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी अथवा उपक्रमाचा घटक बनण्यासाठी अमर पाटील 9699823619, अर्जुन चव्हाण 9920465612,. गिरीराज दरेकर 969949112, छाया जोगळेकर 9322170134, शर्मिला भांडुगळे 7777051116, प्रशांत गायकर 7715033402 यांच्यांशी संपर्क साधावा.