सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या सूचनांचे पालन करत समस्यांचे निवारण केल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांकडून प्रभाग ८७ मधील शिवसेनेच्या नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांचा दिवाळीच्या पहिल्या दिवशी उद्यानात नागरी सत्कार करण्यात आला.
पावसाळा कालावधीत साथीच्या आजारावर मार्गदर्शन करताना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवेंच्या प्रयत्नांने महापालिका प्रशासनाने जनजागृती करताना पथनाट्य सादर केली. यावेळी विभागातील महापालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज उद्यानात ज्येष्ठ नागरिकांनी नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे काही समस्या निदर्शनास आणून देताना सुविधांबाबत काही सूचनाही केल्या. ज्येष्ठांच्या सूचनांचा आदर करत नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी तात्काळ उद्यानात सुविधा उपलब्ध करून देत ज्येष्ठांना हवे तसे काम करून दिले. उद्यानात नव्याने शौचालय बनविण्यात आले. ओपन जीमच्या खाली पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले. ज्येष्ठांना आसन व्यवस्था वाढविण्याबरोबरच अन्य सुविधा नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी उपलब्ध करून दिल्या.
नगरसेविकेने आपल्या सूचनांचा आदर करत समस्यांचे निवारण केल्यामुळे नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांचा ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने विशेष सत्काराचे आयोजन उद्यानातच दिवाळीच्या पहिल्या दिवशी सांयकाळी करण्यात आले होते. या आयोजनात नेरूळ सेक्टर ६, ८, १० व जुईनगरमधील ज्येष्ठांनी पुढाकार घेतला होता. ज्येष्ठांनी केलेल्या या सत्कार समारंभात स्थानिक रहीवाशी व विशेषत: महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. या कार्यक्रमात शिवसेनेचे माजी नगरसेवक व शिवसेना विभागप्रमुख रतन नामदेव मांडवे, शरद पांजरी, शलाका पांजरी, प्रकाश वाघमारे, प्रकाश कारभार, सुरेश मोरे, नामदेव दळवी,रामभाऊ शिरवाळे, मंगेश शिवतरकर, नारायण बांदल, शंकर पडवळ, घाडगे आदी सहभागी झाले होते. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिकांचे प्रतिनिधी अनिल शिरोडकर, नितीन वाघमारे यांनीही विशेष पुढाकार घेतला होता. यावेळी सत्काराला उत्तर देताना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी ज्येष्ठांप्रती आभार मानताना यापुढेही आपण ज्या ज्या वेळी सूचना मांडाल, समस्या निदर्शनास आणून द्याल, त्या सर्व सूचनांचे पालन करून समस्यांचे तात्काळ निवारण करून देण्यात येईल असे सांगताना ज्येष्ठ नागरिक उद्यानात ठेवत असलेल्या स्वच्छतेचीे नगरसेविका सौ. मांडवे यांनी विशेष प्रशंसा केली.