नवी मुंबई : छत्रपती कला क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान सेक्टर-१८ नेरुळ आयोजित नेरुळ ते शिर्डी पायी पालखी सोहळा रविवारी सकाळी ७ वाजता श्री साई बाबांची आरती करून सुरु झाला नेरुळ येथून वाजत गाजत साई पालखीची सुरवात झाली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका सौ.रुपाली किस्मत भगत आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ तालुकाध्यक्ष गणेशदादा भगत यांच्या सौजन्याने सर्व पदयात्री आणि साई भक्तांना टी शर्ट दिले गेले आहेत . या पालखी सोहळ्यात शिवसेना उपनेते विजय नाहटा, स्थानिक शिवसेना नगरसेवक काशिनाथ पवार, माजी कार्यसम्राट नगरसेवक सतीश रामाणे, शिवसेना शहरप्रमुख विजय माने, समाजसेवक रवींद्र भगत यांच्यासह सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक रहीवाशी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पालखी सोहळ्यात स्मरण ढोल ताशा व ध्वज पथक नवी मुंबई आणि मी नेरुळकर बॅन्जो पथक यांनी सुंदर असे सादरीकरण केले विविध ठिकाणी आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती तर काही सोसायटीत पदयात्री आणि साई भक्तानं साठी अल्पोपहाराची व्यवस्था केली होती मोठ्या प्रमाणावर परिसरातील साई भक्त पालखी सोहळ्यास उपस्थित होते . आज सुरु झालेली पदयात्रा १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता श्री क्षेत्र शिर्डी येथे पोहचणार आहे
मंडळाच्या वतीने दिनांक १-१२-१८ रोजी सायंकाळी ६ वाजता श्री अनिरुद्ध बापू मैदान सेक्टर-१८ येथे श्री सत्यनारायण महापूजा व साई भंडारा आयोजित केला आहे. या साई भंडाऱ्यात नवी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक साई भक्तांकडून करण्यात आले आहे.-