नवी मुंबई :– नवी मुंबई येथील चिंचपाडा प्रभाग सात मधील स्थानिक नगरसेवक व विरोधी पक्षनेता श्री विजय चौगुले यांच्या मदतीने ठाणे लोकसभा खासदार राजन विचारे साहेबांच्या प्रयत्नाने सदर ठिकाणचा कचरा सांडपाणी व इतर टाकाऊ वस्तू वापरून सामूहिक बायोगॅस युनिट बांधण्यात येणार आहे अशा प्रकारचा बायोगॅस प्रकल्प हा प्रथमच नवी मुंबईमध्ये कोणत्या प्रभागात करण्यात येणार आहे या बायोगॅसच्या माध्यमातून वीज निर्माण करण्यात येणार आहे ज्याचा उपयोग वस्तीमधील पास्पाठ दिवे व महानगरपालिकेच्या शाळेसाठी होणार आहे तसेच या प्रकल्पातून तयार होणारा गॅस लोकांना स्वयंपाकासाठी वापरण्यास मिळेल. या बायोगॅस प्लांटच्या निर्मितीमुळे तब्बल पंचवीस हजार लोकांना म्हणजेच पाच हजार कुटुंबांना फायदा होणार आहे
सदर बायोगॅस प्लांट हा खासदार श्री राजन विचारे साहेबांच्या खासदार निधीतून तसेच स्वर्गीय मीनाताई चौगुले संस्था व नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने बांधण्यात येणार आहेत. हा प्रकल्प जानेवारी 2019 मध्ये यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात येणार आहे असा शब्द नवी मुंबई महानगपालिकेचे कार्यकारी अभियंता श्री गिरीश घुमस्तेयांनी दिला. या विभागात तब्बल 1500शौचालय बांधण्यात आलेले आहेत व त्या सर्व शौचालयचे सांडपाणी थेट बायोगॅसमध्ये सोडण्यात योजना केलेली आहे व वस्तीतला घनकचरा ओला कचरा विघटीत होणारा कचरा या बायोगॅस मध्ये टाकण्यात येईल जेणेकरून या प्रभागातील जमा होणारा कचरा डंपिंग ग्राउंड मध्ये न टाकता बायोगॅसमध्ये वापरला जाईल व त्यातून लोकोपयोगी बायोगॅस स्थानिक लोकांना मिळू शकेल या पद्धतीमुळे कचरा नेण्यासाठी लागणारा खर्च सुद्धा वाचू शकतो. या वेळी नगरसेवक विजय चौघुले यांनी खासदार साहेबांचे आभार मानले व सांगितले खासदार राजन विचारे साहेब हे विकासासाठी प्रयत्नशील असतात व जनतेच्या समस्या सोडविण्यास कायम तत्पर असतात.
सदर ठिकाणी खासदार श्री राजन विचारे साहेबांनी भेट देऊन कामाचा आढावा घेतला तसेच त्यांच्या सोबत स्थानिक नगरसेवक व विरोधी पक्षनेता श्री विजय चौगुले साहेब, नगरसेवक द्वारकानाथ भोईर साहेब, नगरसेवक ममित चौगुले, कार्यकारी अभियंता महानगरपालिका नवी मुंबई गिरीश घुमस्ते, नवी मुंबई महानगरपालिकेचे सहायक आयुक्त व वार्ड ऑफिसर श्री अनंत जाधव व आदि मान्यवर उपस्थित होते.