जालना : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ऍड.प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग आणि लोकांचा अक्षरशः वेडे होऊन मिळणारा प्रतिसाद आगामी काळात राज्यात अनेक विक्रमांची नोंद करून जाईल अशा घटना घडायला सुरुवात झाली आहे .
आज चक्क शिवसेनेच्या जालन्यातील नगरसेविका वैशाली ठोसरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांना सादर करून भारिप-बहुजन महासंघात काम करण्याची इच्छा व्यक्त केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.जालना नगर पालिकेत शिवसेनेचे ११ नगरसेवक असून या पैकी एक वैशाली ठोसरे या वार्ड क्रमांक २९ या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जागेवरून दोन वर्षांपूर्वी निवडून आल्या.
मूळची अकोलेकर असणारी ही भीमकन्या बऱ्याच वर्षांपासून शहरात वास्तव्याला आहे,बाबासाहेबानी दिलेल्या राजकीय शिकवणुकीमुळे आपणही राजकारणात जाऊन समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द वैशालीच्या मनात निर्माण झाली मात्र संधी मिळत नव्हती,शेवटी तीने जावई सुधाकर निकाळजे यांच्या सल्ल्याने सेनेची उमेदवारी घेऊन राजकारणात उडी घेतली आणि ती निवडून आली. सेनेचे ११ नगरसेवक निवडून आले ,सत्ता काँग्रेसची आली त्यामुळे वार्डात काहीच विकासकामे होऊ शकली नाही,दरम्यान भीमा कोरेगाव घटनेनंतर ऍड प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेला मिळणारे समर्थन आणि आंबेडकर घराण्याचे समाजाप्रती असणारे योगदान लक्षात घेत वैशाली ठोसरे यांनी बागावत करण्याचा निर्णय घेतला.
काल १६ नोव्हेंबर ला प्रा.अंजली आंबेडकर यांचा जालना दौरा होता, त्यांची भेट घेऊन वंचित बहुजन आघाडीत काम करण्याचा मनोदय तिने बोलून दाखवला,मात्र आमच्या सोबत यायचे असेल तर तुला शिवसेनेचे नगरसेवक पद सोडावे लागेल अशी अट अंजली आंबेडकर यांनी घातली ती तात्काळ मान्य करीत उद्याच नगरसेवक पदाचा राजीनामा देते अशा शब्द वैशाली ठोसरे यांनी त्याच भेटीत दिला.
आंबेडकर घराण्याच्या सुनेला दिलेला शब्द खरा करून दाखवीत आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटून वैशाली ठोसरे यांनी शिवसेना नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन आपले शब्द खरे केल्याचे दाखवून दिले.
वैशाली यांचा ३वर्ष कार्यकाळ शिल्लक होता,या जागेची पोटनिवडणूक लागल्यावर पुन्हा रिंगणात राहणार का ? असा प्रश्न त्यांना विचारला असता ,पक्षाने संधी दिल्यास उमेदवारी करेल आणि शंभर टक्के निवडून येईल असा विश्वास या बहाद्दर भीमकन्येने व्यक्त केला.