तशी माझी ओळख एक सामान्य शिवसैनिक म्हणूनच आहे.
बाळासाहेबांचा कट्टर, निडर शिवसैनिक असे बिरुद छातीवर अभिमानाने मिरवणाऱ्या करोडोंपैकी मी एक ,जन्म मुंबईचाच. त्यामुळे मुंबईच्या मराठी माणसांच्या समस्या आणि अडचणी याबद्दल अनभिज्ञ. परंतु त्यावेळी “शिवसेना” या छोट्याशा चार अक्षरी चळवळीबद्दल बोलले जायचे. सर्वांच्या बोलण्यात एक आवेश आणि खदखदत असलेला राग असायचा. विषय मला कधीच कळला नव्हता पण गांभीर्य मात्र जाणवायचे. माझ्यासाठी हा विषय तिथेच संपायचा. परंतू मला या आगीची धग लागायला वेळ नाही लागला. बाळासाहेब नावाचे वादळ महाराष्ट्रभर घोन्घाऊ लागले. त्यांच्या प्रत्येक सभेबरोबर हजारोंचा जमाव शिवसेनेत दाखल होत गेला. प्रस्थापितांविरुद्ध आपल्याच घरात झालेल्या विस्थापितांची हि लढाई पुढे अतिशय आक्रमक होत गेली. “शिवसेना” या चार अक्षरांनी भल्या भल्यांच्या उरात धडकी भरू लागली.मी निवडणुक प्रचार दरम्याण आजोळ महाड दासगांव येथे गेलो असता मामाने मला सभेला नेल ती
१९८५ साली महाड मध्ये झालेल्या सभेत बाळासाहेबांच्या भाषणाने मला भारून टाकले. एकाच वेळी करोडो लोकांच्या मनावर राज्य करणारया राजाचे मांडलिकत्व मला मान्य झाले. झोकून दिले मी स्वतःला. सुरवातीच्या काळात मवाली, टारगट, बिघडलेली कार्टी म्हणून काँग्रेसी बुजुर्ग आम्हाला हिणवत असत. मग आम्ही “बी घडलो” तुम्ही “बी घडाना” असे उत्तर द्यायचो. कालांतराने त्यांचे मनही पलटले. शिवसेनेचा झंझावात महाराष्ट्रात पसरला. सगळे कसे भगवेमय झाले होते.
“नकळत रक्ताचाहि रंग बदलून भगवा झाला”
बाळासाहेबांची कीर्ती देशात आणि कालांतराने जगभर पसरली. त्यावेळी शिवसेनेने केलेला मुंबईचा कायापालट येणाऱ्या बदलाची जणू ग्वाही देत होता. मराठी मन भक्कम आणि कणखर बनत गेले. शिवसेनेच्या माध्यमातून कित्येक कुटुंबांना सावरण्यास हातभार लागला. ही संपूर्ण वाटचाल अतिशय कठीण आणि खडतर होती. संपूर्ण मिडिया शिवसेनेविरोधात गरळ ओकत असताना साहेबांनी एकट्यांनी हो मोट बांधली. त्यासाठी तब्येत, उन, पाउस, थंडी, सर्व बाजूंनी होणारी टीका यांची पर्वा न करता संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला, शिवसैनिकांशी थेट संवाद साधला
आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण केले. शिवसैनिकांना केंद्रभागी ठेवूनच त्यांनी वीस % राजकारण ८०% समाजकारण केले. हिंदुत्वाची कास धरताना त्यांनी देशप्रेमी सर्वधर्मियांना जवळ केले आणि त्यांचा मान ठेवला. म्हणूनच त्यांना एवढे प्रेम आणि आदर प्राप्त झाला.
एका उत्तुंग व्यक्तिमत्वाने बांधलेल्या संघटनेबरोबर माझीही वाटचाल सुरूच होती.
कालांतराने निमसरकारी नोकरी आणि वृत्तपञ लेखन शिवसेना शाखा आपल्या जवळ कोणी बोलु अथवा न बोले याचा मी कधीच विचार केला नाही.बस साहेबांचा शिवसैनिक . पण अंतराने मन दुरावले नाही. शिवसेना माझ्याबरोबर जेथे जाईन तेथे गेली. माझ्या परिचयाच्या सर्व भारतीयांमध्ये माझी ओळख “कट्टर शिवसैनिक” अशीच बनून गेली. “कट्टर” तोच “शिवसैनिक” आणि “शिवसैनिक” तो “कट्टर” अशी एक व्याख्या तयार झाली. मुळात “कट्टर” या बिरुदाचा अर्थ आणि आनंद फक्त शिवसैनीकालाच कळू शकतो, बाकी कोणालाही नाही.
२०१२ ची दिवाळी आम्हाला दगा देवून गेली. साहेब आजारी असल्याच्या बातम्या थडकल्या आणि सैनिकांचे मातोश्रीबाहेर जमले. मीही त्यांत होतो. साहेबांच्या काळजीने संपूर्ण देश काळवंडला. मंदिर, मशीद, गुरुद्वारांमधून साहेबांच्या बरे होण्यासाठी साकडे घालण्यात आले. दिवाळीचा फराळ गोड वाटेनासा झाला. कंदीलही अंधारले. देव पाण्यात घालून बसलेल्या शिवसैनिकांच्या काळजाचा वेध घेणारी बातमी आली. साहेबांनी देहत्याग केला, साहेब आम्हाला सोडून गेले. साहेबांच्या एका शब्दाखातर कोणालाही नडणारे सैनिक आज हरले होते. जगातल्या सर्वात मोठ्या अंतयात्रेला या महान शौर्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी तब्बल १९ लाख शिवसैनिक देशभरातून आले होते.
“त्या दिवशी सुमाद्राने वेढलेल्या मुंबईने आणखी एक सागर लोटलेला पाहिला” पण कुठेही उधाण नव्हते. सारे काही शांत झाले होते. खाऱ्या समुद्राने खाऱ्या अश्रुंचे बांध फुटताना पाहिले होते. पोरके शिवसैनिक साश्रू नयनाने एकमेकांना सभाळत होते, साहेबांनी सुद्धा आम्हाला असेच सांभाळले होते. शिवतीर्थावर अखेर साहेबांना मा. उद्धव ठाकरेंनी अग्नी दिला आणि इतिहासातले एक स्वाभिमानी पर्व संपले.
पाच वर्षे सरली पण साहेबांच्या आठवणीशीवाय एक दिवस गेला नाही. या निमित्ताने पुन्हा एकदा लाखोंच्या संख्येने शिवतीर्थावर जमले. कोठेही कसलाही कोलाहल नाही, गोंधळ नाही, सारे काही शिस्तीत पार पडले. साहेबांनी लावलेली शिस्त तसीच आहे हीच त्यांना खरी श्रद्धांजली.
शिवसैनिक म्हणजे दिलेल्या वचनाला जागणारी निधड्या छातीची जात आहे.
वाघासारखे निधड्या छातीने जगणे आम्हालाच जमत.
भल्याभल्यांना फाट्यावर मारणे आम्हालाच जमते
दुसऱ्यांच्या अडीअडचणीत उभे राहणे आम्हालाच जमत.
अबलांच्या रक्षणासाठी बांधील राहणे आम्हालाच जमत.
अन्याविरुद्ध उभे राहणे आम्हालाच जमत.
तसे संस्कारच आहेत संघटनेचे आमच्यावर.
हे सगळे बघायला मिळणे हे भाग्य आहे आपले. एवढे भाग्य आणखी कोणत्याही संघटनेच्या कार्यकर्त्यांना नाही.
माझ्या शिवसैनिक मित्रांनो अभिमान आहे मला शिवसैनिक असल्याचा, या बांधिलकीचा.
बाळासाहेबांच्या शिवसेनेची ही गौरवगाथा अशीच राहो ही आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.
जय हिंद – जय महाराष्ट्र !
बाळासाहेबांचा शिवसैनिक:श्री.गणेश अंनत नवगरे