नवी मुंबई : नेरूळ सेक्टर चार परिसरात महापालिकेच्या उद्यान व क्रिडांगणालगत असलेल्या एमएसईडीसीच्या विद्युत डीपी (सबस्टेशन) आवारात विविध समस्यांमुळे बकालपणा आहे. या समस्यांचे तात्काळ निवारण करण्याची लेखी मागणी प्रभाग ८४ चे भाजप अध्यक्ष विलास वसंत चव्हाण यांनी महावितणकडे केली आहे.
आपल्या लेखी निवेदनातून भाजपच्या विलास चव्हाण यांनी नेरूळ सेक्टर चार परिसरातील उद्यान व क्रिडांगणालगतची विद्युत डीपी, सनराईज सोसायटीच्या बाजूला असलेली विद्युत डीपी, नेबरहूड शॉपिंग सेंटर या ठिकाणच्या विद्युत डीपी आवारातील समस्या महावितरणच्या लक्षात आणून दिल्या आहेत. विद्युत डीपीचे तुटलेले दरवाजे, दरवाजे सताड उघडे, आवारात जंगली व खुरटी झाडे वाढणे, आवारातील जागेचा वाहन पॉर्किगसाठी वापर होणे यासह अन्य समस्यांचा उहापोह विलास चव्हाण यांनी निवेदनात करताना विद्युत डीपी आवाराची डागडूजी तात्काळ करण्याची मागणी विलास चव्हाण यांनी केली आहे.