नवी मुंबई : सीवूडस सेक्टर ५० या ठिकाणी अल्प व मध्यम उत्पन्न गटातील रहीवाशी राहत असल्याने कार्यक्रमासाठी त्यांना अव्वाच्या सव्वा खर्च खासगी हॉलमध्ये करावा लागतो. त्यामुळे शालेय वेळेव्यतिरिक्तच्य वेळेत या शाळेचे सभागृह स्थानिक रहीवाशांना उपलब्ध करून देण्याची मागणी स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख विशाल विचारे यांनी महापालिका आयुक्तांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
घरातील वाढदिवस, साखरपुडा, विवाह याशिवाय अन्य सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी स्थानिक रहीवाशांना शाळेचे सभागृह उपलब्ध करून दिल्यास महापालिकेला उत्पन्नही प्राप्त होईल. सध्या स्थानिक रहीवाशांना खासगी ठिकाणी हॉलमध्ये अवाजवी भाडे भरून हे कार्यक्रम साजरे केले जात असल्याने त्यांची आर्थिक ससेहोलपट होत आहे. स्थानिकांची निकड पाहता पालिका प्रशासनाने सहानूभूतीपूर्वक मागणीचा विचार करून सभागृह स्थानिकांना उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेना शाखाप्रमुख विशाल विचारे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.