अच्युत पालव स्कुल ऑफ कॅलिग्राफीतर्फे ५ दिवसांचा भारतीय भाषांचा महोत्सव
- १२ भाषांच्या लिपील्पांचे सौदर्य प्रदर्शन
- प्राचीन नाणी आणि दुर्मिळ दस्तावेजांचे दर्शन
- शंखनाद आणि पारंपारिक वेदमंत्रोच्चारात आगळा-वेगळा उद्घाटन सोहळा
- ज्येष्ठ नाट्यशीर्षक रचनाकार कमल शेडगे यांना जीवनगौरव पुरस्कार
- शर्वरी जमेनीस, आरती धानिपकर आणि अनुराग नाईक यांचे कलाविष्कार
नवी मुंबई : भारतीय संस्कृतीची समृद्धी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील वैविध्यात सामावली आहे. हीच बाब भारतीय भाषांच्या संदर्भातही तितकीच सत्य आहे. त्यासाठी त्या भाषांपर्यंत पोहोचायला हवं, तरच हे सौंदर्य न्याहाळता येतं. ही संधी प्राप्त करून देण्यासाठीच अच्युत पालव स्कुल ऑफ कॅलिग्राफीतर्फे चौथ्या कॅलिफेस्टचं नवी मुंबईत आयोजन करण्यात आलं आहे. सिडकोच्या कलाग्राम अर्थात ‘अर्बन हाट’मध्ये ५ ते १० डिसेंबर दरम्यान सुरु राहील. सकाळी १० ते रातौ १० पर्यंत ते सर्वांसाठी खुले राहील.
देशभरातील विविध राज्यांतील १२ अग्रणी शब्द-शिल्पकार आपापल्या भाषांच्या लिप्यांतील सौदार्याविशाकार या महोत्सवात मांडणार आहेत. एका आगळ्या-वेगळ्या शैलीत पारंपारिक वेदमंत्रोच्चारात आणि शंखनादाच्या सुरात उद्घाटन समारंभ पार पडेल. शब्द-सुरांनी भारलेल्या या वातावरणात मग मुळाक्षरं बागडू लागतील. मुळाक्षरांच्या रुपात मुले औपचारिक उद्घाटन सोहळ्याच्या स्थळाकडे जातील.
गेली पाच दशके नाट्यशीर्षक रचनांद्वारे आणि विविध मनोरंजन कार्यक्रमांच्या शीर्षक लेखानाद्वारे आपली वेगळी ओळख निर्माण करणारे श्री. कमल शेडगे यांना यावेळी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अच्युत पालव स्कुल ऑफ कॅलिग्राफीतर्फे हा पुरस्कार देण्यात येणारा हा पहिलाच पुरस्कार आहे. राज्यसभेचे सदस्य आणि ज्येष्ठ पत्रकार श्री. कुमार केतकर यांचे यावेळी अध्यक्षीय भाषण होईल. देण्यात आला आहे. नवनीत एज्युकेशनचे संचालक दिलीप गाला हे स्वागताध्यक्ष आहेत.
उद्घाटन स्थळाच्या अॅम्फी थिएटरमध्ये ख्यातनाम कथक नृत्यांगना आणि समूह-नृत्य रचनाकार शर्वरी जमेनीस या आपल्या नृत्याद्वारे विविध लीप्यांतील सौदर्य साकारतील. या नृत्यासाठी खास तयार करण्यात आलेला पेहराव जागतिक कीर्तीचे शब्द-शिल्पकार अच्युत पालव याच्या कॅलिग्राफीने सुशोभित झालेला असेल. वरिष्ठ शिल्पकार प्रमोद कांबळे यांचा अक्षरशिल्पाच्या प्रात्यक्षिकाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.
सुलेखन म्हणजे केवळ सुंदर किंवा सुवाच्च्य लेखन नव्हे, ती एक दृश्य कला आहे. ही कला लोकप्रिय करणे हा कॅलिफेस्टचा मूळ उद्देश! जन-सामान्यांपर्यंत ही कला पोहोचविण्यासाठी अनेक-विध उपक्रम अच्युत पालव यांनी आजवर पार पाडले आहेत. शब्द-शिल्पांचा हा महोत्सव त्यापैकीच एक. या महोत्सवात कॅलिग्राफीची अन्य कलांशीही सांगड घालुन मनोरंजनाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. आरती धानिपकर आणि अनुराग नाईक यांचे कलाविष्कार हा असाच एक कार्यक्रम.
बहुभाषिक भारतातील सर्व भाषांमध्ये वेगवेगळ्या स्तरावर आपापल्या शैलीत काम करून हे कला विकसित करणाऱ्या शब्द-शिल्पकारांऱ्या या मेळाव्यात कलारसिकांना, कालाभ्यासाकांना आणि विविद भाषिकांना आपापल्या भाषेतील शब्द-शिल्पांचे अनेकविध अविष्कार पाहण्यास मिळतील. विविध क्षेत्रात केला जाणारा या कलेचा वापर पाहण्याची संधीही नागरिकांना मिळणार आहे.
लिप्यांच्या स्थित्यंतराचे आणि विकासाचे पुरावे असणारी प्राचीन नाणी आणि दस्तावेज याच्न्हे प्रदर्शन, शालेय शिक्षकांसाठी तसेच विद्यार्थ्यासाठी अक्षरलेखन सुधारणा कार्यशाळा, प्रात्याक्षिके असा भरगच्च कार्यक्रम असलेल्या ‘कॅलिफेस्ट १८’चा लाभ घ्यावा असे आवाहन अच्युत पालव स्कुल ऑफ कॅलिग्राफीतर्फे केले आहे.