सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्यांना विद्यार्थ्यांना पुरक पोषक आहार म्हणून शेंगदाणा चिक्की उपलब्ध करून देण्याची लेखी मागणी शिवसेनेचे महापालिकेतील सानपाडा येथील ज्येष्ठ नगरसेवक सोमनाथ वासकर यांनी महापौर जयवंत सुतार यांच्याकडे केली आहे.
महापालिका शाळेतील विद्यार्थ्याना पूरक पोषक आहार गेल्या १० वर्षापासून महापालिका प्रशासनाकडून दिला जात होता. जानेवारी २०१८ मध्ये संबंधित पूरक पोषक आहार पुरवठाधारकाची मुदत संपली. महापालिका प्रशासनाकडून या ठेकेदाराला तीन वेळा मुदतवाढही देण्यात आली. परंतु अंतिम मुदतवाढ देत असताना दिवसाआड पुरक पोषक शेंगदाणा चिक्की वाटप करण्याचे निर्देश दिले होते. तथापि ३ नोव्हेंबर २०१८ रोजी संपुष्ठात आली आहे. पालिका प्रशासनाकडून मुदतवाढ न दिल्याने संबंधित ठेकेदाराने चिक्की वाटप बंद केले आहे. पुढील निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यत पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना पूरक पोषक आहार म्हणून चिक्की वाटप करण्याचे आदेश पालिका प्रशासनाला देण्याची मागणी शिवसेना नगरसेवक सोमनाथ वासकर यांनी महापौर जयवंत सुतारांकडे केली आहे.