पेपर वाचणारे आणि पेपरात लिहिणारे सगळेच सुशिक्षित आहेत, वेगवेगळ्या वर्षी, वेगवेगळ्या काळात कोणी पदवीधर होते, कोणी द्विपदवीधर झाले आहेत पण त्यावेळची शिक्षण पद्धती आणि आत्ताची शिक्षण पद्धती यात मला खूप अंतर वाटते आणि मी आता जेव्हा माझ्या नातवाचा अभ्यास बघितला, त्याला देण्यात येणार्या कविता आणि विषय बघितले तेव्हा मला क्षणभर असे वाटले की या सर्व पिढीला दहावीलाच पदवीधर करणार आहे की काय? पण ज्या वेळेला मी या गोष्टीकडे नीटपणे बघितले तेव्हा लक्षात आले की ही जी गुणांची आणि टक्केवारीची शर्यत लावली गेली आहेत, ती खरे तर विद्यार्थ्यांच्या विषय समजण्यात नसून कोण किती चांगले पाठांतर करतो यामध्ये आहे, त्यामुळे भविष्यात चांगले स्कॉलर होणार की पोपट होणार हा खरा विषय आहे.
सध्याचे जे शहरी पालक आहेत त्यांच्या सोबत माझी नेहमी भेट गाठ होत असते आणि ज्यावेळी ह्या तरुण शहरी पालकांशी संवाद होतो तेव्हा एक गोष्ट मला नेहमी आढळून आलेली आहे ते म्हणजे ह्या पालकांचे वर्ल्ड इकॉनॉमी, पॉलिटिक्स अँड इट्स रिपरकेशन, व्हॉटगव्हर्नमेंट शुड डु ? वगैरे, खरं सांगतो त्यांचे हे सगळे विविध विषयावरील ज्ञान ऐकून मी खरोखरच प्रत्येकवेळी भारावलो जातो. पण मग ज्यावेळी त्याच्या मुलांविषयी बोलणे चालू होते तेव्हा लक्षात येते की मुलांना व्यस्त ठेवण्यासाठी शाळांनी अजून काय काय केले पाहिजे, त्याबाबतीत त्यांच्या सूचनाही प्रचंड असतात. मग सहज विचारले मुलांचे साधारण दिवसाचे व्यवस्थापन, सॉरी, टाईमटेबल काय असते? तर जे त्यांनी सांगितले, त्यामुळे खरे तर मला त्या लहान मित्रांची किव आली.
सकाळी सहा वाजता उठून या लहान मित्रांची मम्मी त्यांच्यासाठी स्मॉल ब्रेकफास्ट आणि लॉंग ब्रेकसाठी काही पौष्टिक पदार्थ तयार करते. हो, कारण शाळेच्या सक्युलरमध्ये तसे नमूद केलेले असते की मुलांना दोन टिफिन द्यावेत. एक टिफिन स्मॉल ब्रेकसाठी आणिएक टिफिन लॉंग ब्रेकसाठी. मग साडेसहा सातपर्यंत मम्मी मुलांना उठवते आणि आंघोळीला नेते आणि मग फॅन्सी टॉवेलमध्ये मुलांना सुकवते मग बेबी पावडर अंगाला, बेबी तेल डोक्याला वगैरे सगळी बेबी उत्पादने त्यांना लावून युनिफॉर्म घालून खाली बससाठी घेऊन जाते आणि मग स्वतःच्या आणि नवर्याच्या तयारीला लागते. हो दोघांना नऊ वाजेपर्यंत घरातून बाहेर पडायचे अडते, एक तर दोघे आपल्या गाडीने जाणार असतात किंवा रेल्वेने शहरात जाणार असतात आणि स्वतःच्या भुकेसाठी आणि नवर्याच्या प्रेमापोटी ब्रेकफास्ट डब्यात घेऊन जातात, एक तर गाडीमध्येच हा ब्रेकफास्ट उरकतात किंवा ऑफिसमध्ये पोहोचल्याबरोबर बॉस यायच्या अगोदर ब्रेकफास्ट उरकून घेतात.
माझ्या मनात सहज विचार आला की या सगळ्या करिअर ओरिएशन्सच्या नावाखाली मुलांचे बालपण खरोखर असे भरडले जाते आहे की मुलांना आता बालपण नेमके कसे असते या विषयी माहिती देण्यासाठी अभ्यासक्रमात आता एक धडा ठेवण्याची पाळी आलेली आहे. कारण या पालकांच्या बोलण्यात मुलांच्या खेळाबाबत, त्यांच्या आवडी निवडी बाबत, त्यांनी शाळेत केलेल्या खोडयांबाबत त्यांच्या मित्रांबरोबर स्पर्र्धेेत घेतलेल्या सहभागाबाबत एकही शब्द त्यांच्या तोंडून ऐकल्याचे माझ्या ऐकिवात आले नव्हते. त्यामुळे आपली मुले ही आपली पुढची पिढी आहे की निव्वळ आपली भविष्यातील गुंतवणूक आहे या कोणत्या दृष्टिकोनातून या नात्यांकडे हे पालक बघतात ते देवच जाणे.
पण, सकाळी साडेसहाला जाणारी ही मुले घरी मात्र दोन अडीचपर्यंत येतात. पण आता तर काही शाळा तर पूर्णपणे कारखान्यासारखेकाम करतात. काय तर म्हणे फुल डे स्कुल. ह्या शाळेत नाश्ता, जेवण सगळे काही मिळते आणि वरून शाळा सुद्धा आठ तासाची म्हणजेपालकांना अम्पल टाईम करिअरसाठी मिळतो. पण मग विचार मनात येतो कि हि मुले मैदानी खेळ केव्हा खेळतात? आपल्या आई वडिलांशीकेव्हा बोलतात? त्यांना संस्कार कोण आणि कसे देत असेल? आणि त्यांना माणूस म्हणून कोण तयार करत असेल? सगळ काही डोक गरगरून टाकणारे अनुत्तरित प्रश्न आहेत.
आजकाल सगळ काही इव्हेन्ट आहे, ह्या दृष्टिकोनातूनच बघण्याचे एक वेड ह्या सो कॉल्ड सुशिक्षित लोकात पसरत चालले आहे. मग ते लग्न असो, मुंज असो व इतर काही सगळ्या गोष्टी आता आउट सोर्सिंग व्दारेच केल्या जातात, नशीब पिंडदान करायला काही जणबिझी शेड्युलमधून वेळ काढतात आणि आपले संस्कृती प्रदर्शन करतात.
पूर्वी घोकमपट्टी न्हवती का? तर नाही म्हणणार नाही, घोकमपट्टी पूर्वीसुद्धा होती, पण मार्क मात्र घोकमपट्टीवर कधीच मिळत नव्हते. त्या विषयाच्या समजण्याच्या आधारावर आधारित अभ्यासक्रम आणि परीक्षा आणि मूल्यांकन असायचे. आता मात्र शिक्षण हे फील इन दब्लॅक्स तत्वावर आधारित आहे. मुलांना विषय समजला आहे की नाही याची खात्री करायला ना तर पालकांना वेळ आहे आणि ना शिक्षकांचीती ड्युटी आता राहिलेली आहे. त्यामुळे शिक्षणाचा सध्याचा प्रकार हा प्रॉडक्शन नेसूड आहे, म्हणजे रिझल्ट किती टक्के लागतो ह्यावरसगळी आता गुणवत्ता आधारित आहे.
आज आपण विचार करतो कि ह्या ग्लोबलायझजेशनच्या जगात आपला मुलगा किंवा नातू हा टिकला पाहिजे, मोठा झाला पाहिजेम्हणून आपण एक अशी शैक्षिणक अंगीकरुन पुढे चाललो आहे कि हि शिक्षण पद्धती तयार करणार्याना भारत आणि त्याची व्यवस्था याची सुतरामही माहिती नाही. एकत्र कुटुंब पद्धती, वरिष्ठांचे घरातील योगदान वगैरे याबद्दल माहिती नसल्यामुळे कामावर जाणार्या दोनव्यक्तीच्या कुटुंबातील मुलांचे दिवसभरासाठी नियोजन करणे म्हणजेच स्कुलिंग आणि जास्तीत टक्के मिळविण्यासाठीचे पाठांतर, होमवर्क, क्लासवर्क आणि त्यात काय कमी म्हणून काय तर क्राफ्टिंग वगैरे सगळ्या डोक्याबाहेरच्या गोष्टी आहेत. कारण जी शिक्षण पद्धती आपणअंकगिकारत आहोत त्यामुळे आपल्या भारतीय व्यवस्थेत मात्र काही एक योगदान मिळत नाही उलटपक्षी ह्यातील जे बुद्धिवान आहेत ते ह्याशिक्षण पध्द्तीत तयार होऊन आणि कुटुंबाने केलेल्या डेव्हलपमेंटमध्ये घडून विदेशात जातात आणि नावारूपाला येऊन एक तर भारतातमार्गदर्शक म्हणून येतात किंवा तिथेच सेटल होतात आणि जर उदाहरणदाखल खात्रीच करायची असेल तर जे नामवंत आहेत त्यांचे बॅकग्राउंड बघितल्यास खरोखर कळेल की जर भारतीय संस्कृती अंगीकारून आणि या संस्कृतीला समजून जर अभयसक्रम रचला गेला तर मला खात्री आहे की जगात भारतातील विद्वानाची प्रचंड प्रमाणात जगभरात मागणी असेल आणि भारताला बौद्धिक प्रगतीपासून कोणीही रोखू शकणार नाही.
परंतु ह्या सर्व गोष्टीकडे कानाडोळा करून आपली व्यवस्था ढकलणे चालू आहे. ह्यात दोष कोणाचा हा अजून एक संशोधनाचा विषय आहे. पण स्थानिक पातळीवर जर चर्चा करायची असेल तर याची सुरूवात आपण महापालिकेपासून पण सुरु करू शकतो, आपल्याकडे श्री सोनम वांगचुक सारखे शैक्षणिक विषयाची साधना करणारे राजकारणी आहेत. पण त्याचा उपयोग मात्र आपण बोलण्या पलीकडे करत नाही आणि एकदा शिक्षण समितीच्या सदस्यांची प्रगल्भता कळल्यास लक्षात येते की आपण शाळेत पुढची हुशार आणि परिपूर्ण पिढीतयार करत नसून फक्त रट्टा मारणारे पोपट तयार करत आहोत.