सुजित शिंदे : ९६९१९७४४४
नवी मुंबई : केवळ नागरी सुविधा पुरविणे आणि नागरी समस्यांचे निवारण करणे यापुरतेच सिमित न राहता गृहनिर्माण सोसायट्यांना भेटी देवून स्थानिकांशी सुसंवाद साधणे, गृहनिर्माण आवारातील प्रकल्पांची माहिती जाणून घेणे, लोकांच्या अडीअडचणी जाणून घेणे याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ तालुकाध्यक्ष गणेशदादा भगत आणि प्रभाग ९६च्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत सातत्याने पुढाकार घेत असतात. नेरुळ प्रभाग क्रमांक- ९६ मधील नेरुळ सेक्टर-१६ येथील सी ब्रिज टॉवर सोसायटीने उभारलेल्या कंपोस्टिंग प्रकल्पाची स्थानिक नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत पाहणी करताना तालुकाध्यक्ष गणेशदादा भगत, समाजसेवक दिलीप खांडे, रमेश नार्वेकर, अशोक गांडाल, बाजीराव धुमाळ, आनंद पवार, शांताराम मातेले, गोरक्षनाथ गांडाल, विकास तिकोणे, रविंद्र भगत उपस्थित होते.
सोसायटी स्वतःचा कंपोस्टींग प्रकल्प उभारून कंपोस्ट खत तयार करत आहे. या खताचा वापर सोसायटीतील झाडांसाठी करत आहे. २८० सदनिकांमधून ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार केले जाते. या प्रकल्पाला तब्बल ५ लाख खर्च आला असून सोसायटीतील झाडांचा पालापाचोळाही प्रकल्पात वापरला जातो. कचऱ्याच्या गाडीत केवळ सुकाच कचरा टाकला जातो. सोसायटी दरवर्षी वृक्षारोपण करते. सोसायटीत छोटी-मोठी झाडे असून कंपोस्ट खतामुळे त्यांची चांगली वाढ होत असल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष त्रिपाठी यांनी सांगितले.
आपण निर्माण केलेल्या कचऱ्याची आपणच विल्हेवाट लावल्यास त्याचा इतरांना त्रास होणार नाही. शहरातील सर्व सोसायट्यांना असा प्रकल्प उभारल्यास महापालिकेवरील मोठा ताण कमी होईल, असे स्थानिक नगरसेविका रुपाली किस्मत भगत यांनी सांगितले आणि कंपोस्टिंग चालू केल्याबद्दल सी ब्रिज टॉवर सॊसायटीच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. सोसायटीला भेट देऊन प्रकल्पाची पाहणी केल्याबद्दल सोसायटी कमिटीच्या वतीने स्थानिक नगरसेविका रुपाली किस्मत भगत यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.