सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : अखिल आगरी कोळी समाज प्रबोधन ट्रस्ट आयोजित १३ व्या आगरी कोळी महोत्सवाचे २ ते १३ जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाचा उदघाटन सोहळा बुधवार दि.२ जानेवारी रोजी श्री गणेश रामलीला मैदान नेरुळ येथे संपन्न होणार आहे.
भूमिपुत्राच्या न्याय्य हक्कासाठी स्थापन झालेल्या या ट्रस्टच्या माध्यमातून विविध सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्याच्याच एक भाग म्हणून दरवर्षी नेरुळ येथे आगरी कोळी महोत्सवाचे आयोजन केले जाते. दर वर्षी ५० हजाराहून अधिक लोक या महोत्सवाचा लाभ घेतात. यंदा महोत्सवाचे १३ वे वर्ष असून २ जानेवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाचा उदघाटन सोहळा रंगणार आहे. दि.३ जानेवारी रोजी “हिच खरी आगरी कोळ्यांची दौलत” तर ४ तारखेला महिलांच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ५ जानेवारी रोजी “आंतर शालेय समुहनृत्य”, ६ जानेवारी रोजी गदिमा व बाबूजींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित खास लोक आग्रहस्तव अनंतबुवा भोईर प्रस्तुत “गीत रामायण” हा कार्यक्रम होणार आहे. ७ जानेवारी रोजी “आगरी कोळी रैंप वॉक”, ८ जानेवारी रोजी “नवी मुंबई आयडॉल” अर्थात एकल गीत गायन स्पर्धा, ९ जानेवारी “लावणी स्पर्धा” , १० जानेवारी- “वारसा माझ्या कलेचा”, ११ जानेवारी “नाचान रंगला कोलीवारा”, १२ जानेवारी एन.आर. बी. एज्युकेशन, सोशिअल व कल्चरल संस्थेचे “स्नेह सम्मेलन” , १३ जानेवारी- “दादूस आलारे” सांस्कृतिक कार्यक्रम व “समाज गौरव पुरस्कार प्रदान सोहळा, असे कार्यक्रम होणार आहेत.
१२ दिवस चालणारे हे कार्यक्रम पुर्णता निशुल्क असून जास्तीत जास्त लोकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नामदेव भगत यांनी केले आहे.