या वेळच्या लेखासाठी कोणता विषय निवडावा या विचारात असताना, आदरणीय श्री. नसरुद्दीन शाह यांची मीडियातील स्टेटमेंट ऐकली आणि मग विचार किएव्हढया मोठ्या माणसाला मीडियामध्ये जाऊन सांगावे लागते आहे कि तो घाबरला आहे, मला हे ऐकून खूप वाईट वाटले, माझा उर भरून आला की ज्या देशाला यामाणसाने उत्तम फिल्म्स दिल्या, या देशातल्या नागरिकांनी भरभरून प्रेम, सन्मान आणि पैसा दिला, मग त्याला जर भीती वाटत असेल तर एखाद धीर देणारे पत्र लिहायचे ठरवले आणि लेख सोडला आणि पत्र लिहायला बसलो .
आदरणीय नसरुद्दीन शाहसाहेब ,
! नमस्कार !
आपण अत्यंत काळजीत आहात आणि भीती वाटत असल्याचे आपण मीडियाला सांगत होता, ऐकून खूप वाईट वाटले. आपण भले आपले काम भलं अशा वृत्तीचे आपले व्यक्तिमत्व म्हणून मी आपणास आजपावेतो ओळखत आलो. आपण कोणाचे चांगले केले, किंवा वाईट केले, किंवा कुठल्याही सामाजिक उपक्रमात भाग घेतल्याचे कधीही ऐकिवात नाही, आपण भले आपले काम भले, आपले इनकम भले या भावनेतून जगत होता. पेजशी जेवढा आपला संबंध तेवढा आपल्या देशाच्या मातीशी दुरावा अशी आपली पध्द्त आजपावेतो अनुभवली आणि अशा व्यक्तीला जर स्वतःसाठी, स्वतःच्या मुलांच्या जीवनासंदर्भात काळजी आणि भीती वाटत असेल तर एवढेच सांगावेसे वाटते की आम्ही तुम्हाला जैसे पैसे कमावून दिले तसेच आम्ही आपणाला या भीतीच्या काळात साथही देवू. भले तुम्हाला कोणाचे घेणे देणे नसेल, परंतु भारतातल्या प्रत्येक नागरिकांबद्दलआम्हा सर्व सामान्यांना खूप आपुलकी आणि जीवापाड प्रेम आहे.
याबाबत मला आठवणीत असलेल्या काही गोष्टी आपल्याला धीर देण्यासाठी येथे लिहावयाशा वाटल्या, समाजाशी नाते नसल्यामुळे कदाचित आपणाला ह्या गोष्टीचीमाहिती नसेल त्यामुळे त्या गोष्टी येथे फक्त आपणासाठी मांडतो आहे.
दोन वर्षापासून महाराष्ट्रात दुष्काळ होता सरकारने तर या बाबतीत बऱ्याच योजना राबविल्या, पण आपल्याच क्षेत्रांतील नाना पाटेकर , मकरंद अनासपुरे, आमिरखान, सई ताम्हणकर अशा किती तरी नामवंतांनी गावोगाव पायपीट केली, पाण्याचे नियोजन करण्याचे काम केले , लोकांमध्ये मिसळून कामे केली. त्या वेळी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या, पूर्ण गावाच्या ठिकाणी तणावाचे वातावरण होते पण आपल्याच क्षेत्रातील लोकांना या भारतात या भारतीयासोबत काम करतेवेळी या आपल्या क्षेत्रातील कोणालाही स्वतःबद्दल किंवा स्वतःच्या कुटुंबाबद्दल कोणतीही काळजी किंवा भीती वाटली नाही. त्यावेळीही भारतात गोहत्या, वगैरे घटना घडल्या होत्या. पण आपल्याच क्षेत्रातील नामवंतांनी सर्वसामान्यांना मदतीचा हात दिला , त्यांचे अश्रू पुसले, त्यामुळे याच भारतीयांकडून याच भारतामध्ये आपण का एवढे भीत आहात आणि काळजी करत आहात ? नका करू असे काही नाही, जसे तुम्ही विचार करता.
आपल्याला आठवतंय का २६/११? त्यानंतर २०१४ ला नवीन सरकार आले आणि आतंकवाद्यांना शोधून शोधून पकडले जावू लागले. पण २६/११ ला पकडला गेलेला कसाबला पण या भारतात न्याय मिळाला, त्याला न्यायालयात बाजू मांडण्यासाठी वकील सरकारी खर्चाने दिला गेला, त्याने सांगितलेल्या सर्व गोष्टीची खातरजमा करणेसाठी भारतीय व्यवस्थेने स्वखर्चाने योग्य नियोजन केले. उलटपक्षी झाले असे की ज्यांना पाकिस्तान चांगला आणि सुखरूप वाटतो. त्याच देशाचा हा कसाब नागरिक असल्याचे कसाबने स्वतःच सांगितले, स्वतःचा पाकिस्तानचा पत्ता सुद्धा दिला. पण तुम्ही विश्वास ठेवत नसलेल्या या भारतीय व्यवस्थेने आपल्या परराष्ट्र खात्याला सांगितले की कसाब हा पाकिस्तानचा नागरिक आहे तर त्याच्या देशाला कळवा आणि त्याच्या घरच्यांना सुद्धा कळवा. पण या पाकिस्तानने तर सरळ सांगितले कि कसाबचा आणि आमचा काही एकसंबंध नाही. उलटपक्षी त्याने दिलेल्या पत्याप्रमाणे त्याच्या कुटुंबालाकळविण्याचे प्रयत्न काही जणांनी केले तेव्हा असे आढळून आले. पाकिस्तान सरकारने त्या कसाबचे पूर्ण कुटुंबीयच गायब केले आहे. उलटपक्षी आपले जे कोणी चुकून फेसबुक मार्फत झालेल्या प्रेमापोटी पाकिस्तानात गेले आहेत. त्यांना सुखरूपपणे भारतात आणून कुटुंबियांच्या हवाली स्वतः परराष्ट्रमंत्री करत आहेत आणि तुम्ही बुवा उगाचच भारतात भीती वाटून घेत आहात आणि काळजी करत आहात.
तुम्हाला याकूब मेमन आठवतोय का? १९९२ च्या दंगली आठवतायत का? झालेले बॉम्ब स्फोट आठवतायत का? नाही आठवत असेल तर युट्यूब वर थोडे सर्च करा किसगळ्या गोष्टी समोर येतील तुमच्या. यातलाच एक महाभाग म्हणजे हा याकूब बरीच वर्ष तो यंत्रणांच्या हाती लागत नव्हता, आणि असे म्हणतात कि बऱ्याच जणांना आवडत असलेल्या पाकिस्तानात तो रहात होता. ते जाऊ दे, पण एक दिवशी तो पकडला तुम्हाला ठाऊक नसेल कदाचित पण आपल्या न्याय व्यस्थेचे एक ब्रीद वाक्य आहे कि १००गुन्हेगार सुटले तरी चालेल पण एकही निष्पाप व्यक्तीला सजा लागता काम नये आणि असे मानणारे बरेच भारतीय विचारवंत ह्या याकूब मेमनची बाजू घेऊन मैदानात उतरले, सर्वोच्य न्यायालयाने तर पहाटे अगदी ब्रह्म मुहूर्तावर, म्हणजे तीन साडेतीनच्या दरम्यान न्यायालयात येऊन त्याची त्याच्या वकिलामार्फत बाजू ऐकली आणि त्याला गुन्हेगार ठरवून न्याय दिला. जर या भारतात अशा गुन्हेगारांच्या बाजूने न्याय व्यवस्थेसमोर लढणारे भारतीय नागरिक जर कसली काळजी करत नाहीत, त्यांना जनाची किंवा मनाची भीती वाटत नाही तर तुम्हाला कसली भीत वाटते या भारतात रहाण्याची. जाता जाता सांगावेसे वाटते, हो हा लहान मोठा घास घेतल्याप्रमाणे आहे. कारण आपण मशहूर आहात, भरपूर श्रीमंत आहेत, थोर विचारवंत आहेत आणि आम्ही आपले भारतातले कॉमनमॅन आहोत, पण तरी सुद्धा सांगावेसे वाटते की भारत हा एक अत्यंत सहनशील माणसांचा देश आहे. इथे जात धर्म या विषयावर घटना घडत असतील पण त्यासाठी कोणी घाबरत नाही किंवा त्या ना आपल्या मुलांच्याबद्दलही काळजीत पडत नाही. हा देश रामाचा आहे, हा देश छत्रपती शिवरायांचा आहे, हा देश शाहू, फुले, आंबेडकरांचा आहे, हा देश महात्मा गांधींचा आहे, हा देश मौलाना आझाद, सुभाषचंद्र बोस, अब्दुल कलाम आणि तुमचाही आहे. मग का भीती वाटते तुम्हाला, कोणं घाबरवतय तुम्हाला? की तुम्ही घाबरवताय आम्हाला?
माननीय नासीरुद्दीनजी आपण आता जास्त विचार करू नका, नको त्या विचाराने स्वतः घाबरता आणि दुसया घाबरता. त्यापेक्षा घर, इंडस्ट्री, पेज थ्री मधून थोडे बाहेर या भारतात थोडे हिंडा फिरा, आणि बघा शेतकऱ्यांची मेहनत, शहीद झालेल्या जवानांचे घर, बॉर्डरवर उन्हा तान्हात लढणारा सैनिक, अहोरात्र आपली काळजी करणारे पोलीस , सोडा नको त्या लोकांची संगत आणि एकदा जा वाघा बॉर्डरवर आणि सर्व दृष्य बघून झाले कि एकदा मनापासून जोरात आरोळी ठोका भारत माता की जय, वन्दे मातरम आणि मग बघा भीती आणि काळजी पळून जाते ती. अजून काय सांगू आपणाला बस एवढेच सांगतो “नसीरुद्दीनजी घाबरून जाऊ नका”.