नवी मुंबई : डाॅ राजेश पाटील सरचिटणीस भाजपा नवी मुंबई यांनी भाजपा शिरवणे जुईनगर नेरूळ सेक्टर. १ यांच्या माध्यमातून महाआरोग्य मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन शिरवणेगाव येथील हनुमान मंदिर हाॅल येथे केले या शिबिराचे उद्घाटन आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरामध्ये मोफत ईसीजी, बिल्डिंगला, संपूर्ण बाॅडी तपासणी, चष्मा नंबर व चष्मे वाटप करण्यात आले अशा या भव्यदिव्य अशा महाआरोग्य शिबीर जेष्ठ समाजसेवक कांबळे सर यांच्या सहकार्याने महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत भरविण्यात आले होते.
शिबिरामध्ये गरीब व गरजू रुग्णांचा मोठ्याप्रमाणात प्रतिसाद मिळाला ३७० रुग्णांनी लाभ घेतला शिबिराच्या उदघाटन प्रसंगी परिवहन सदस्य काशिनाथ पाटील, भाजपचे मंडळ अध्यक्ष अशोक चटर्जी, सुनीता नाईक, निलम वळवईकर, प्रिती गोळपकर, मंगला बडे, आशा गर्जे, अनिल निकम,सुनील भोसले, दिपक सिंग, ठाकूर, नाईक, अनिल पाटील, श्रीधर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
महाआरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी भाजपचे वार्ड ८९ चे अध्यक्ष प्रभाकर ठाकूर,भाजपचे वार्ड ८१ चे अध्यक्ष दिपेश पाटील, युवा वार्डअध्यक्ष संतोष पाटील, मंडळ उपाध्यक्ष राजू वाळवे, प्रदीप पाटील, इंद्रापाल भोईर, राजेंद्र म्हात्रे, राजेंद्र घरत,शाम म्हात्रे, स्वप्निल पाटील, नामदेव पाटील, संदेश ठाकूर व इतर सर्व पदाधिकारी या सर्वानी मेहनत घेतली.