नवी मुंबई : लोकनेते गणेश नाईक संस्थापित कामगारांचे हित साधणारी कामगार संघटना श्रमिक सेनेच्या पाठपुराव्याला यश आले असून या संघटनेच्या मागणीनुसार नवी मुंबई पालिका सेवेतील अधिकारी आणि कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. बुधवारी झालेल्या नवी मुंबई पालिकेच्या महासभेत या विषयीचा ठराव मंजूर करण्यात आला. त्याचप्रमाणे नवी मुंबई परिवहन सेवेतील अधिकारी आणि कर्मचार्यांना देखील सातवा वेतन आयोग लागू करण्याबरोबरच कंत्राटी, ठोक आणि रोजंदारी तत्वावर काम करणार्या कर्मचार्यांना वेतनवाढ देण्याची सूचना महापौर जयवंत सुतार यांनी दिली.
पालिका आणि एनएमएमटीतील सर्व संवर्गातील कामगारांसाठी सातवा वेतन आयोग तातडीने लागू करावा, अशी आग्रहाची मागणी श्रमिक सेनेचे अध्यक्ष डॉ. संजीव गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली श्रमिक सेनेच्या शिष्टमंडळाने १४ फेब्रुवारी २०१९ रोजी महापौर जयवंत सुतार, पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., स्थायी समितीचे सभापती सुरेश कुलकर्णी, आरोग्य समितीच्या सभापती वैशालीताई नाईक, परिवहन समितीचे सभापती रामचंद्र दळवी, परिवहनचे व्यवस्थापक शिरिष आदरवड आणि पालिकेच्या वरिष्ठ पदाधिकार्यांना मागणीचे निवेदन सादर करुन केली होती. त्या वेळेसच ही मागणी महापौर सुतार आणि आयुक्त रामास्वामी एन यांनी मान्य केली होती. त्यानुसार १ जानेवारी २०१६ पासून पूर्वलक्षी प्रभावाने सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी पालिका करणार आहे. परिश्रमपूर्वक आपली सेवा देवून नवी मुंबईच्या लौकीकात भर घालणार्या पालिका आणि एनएमएमटी मधील सर्व सवर्गातील अधिकारी आणि कर्मचार्यांना तसेच ठोक, कंत्राटी, रोजंदारी तत्वावरील सर्व कर्मचार्यांना त्यांच्या श्रमाचा योग्य मोबादला लोकनेते गणेश नाईक यांच्या कामगार हिताय धोरणानुसार आतापर्यंत श्रमिक सेनेने प्राप्त करून दिला आहे. सातवा वेतन आयोग लागू झाल्याने पालिकेतील अधिकारी आणि कर्मचार्यांनी लोकनेते गणेश नाईक, श्रमिक सेनेचे अध्यक्ष डॉ संजीव नाईक, महापौर जयवंत सुतार, पालिका आयुक्त रामास्वामी एन यांचे आभार मानले आहेत. श्रमिक सेनेचे सरचिटणीस चरण जाधव आणि इतर पदाधिकार्यांनी महापौर सुतार आणि पालिका आयुक्त रामास्वामी यांची भेट घेवून सातवा वेतन आयोग लागू केल्याबददल त्यांचे आभार मानले. महापालिका सेवेत सुमारे २२०० कायमस्वरुपी कर्मचारी असून सुमारे साडेसहा हजार कंत्राटी आणि ठोक कामगार आहेत. २०१६ पासून लागू झालेल्या सातव्या वेतन आयोगानुसार वेतनासोबतच फरकाची रक्कमही कर्मचार्यांना मिळणार आहे. सध्याच्या वेतनावर ४० टक्के वाढ मिळणार आहे. अधिकार्यांच्या वेतनात ४० ते ५० टक्के वाढ होणार आहे. यापुढे वेतनापोटी पालिकेला २३० कोटीं ऐवजी ३२२ कोटी रुपये खर्च येणार आहे.
0000000000000000000000000000000000000
महापौर जयवंत सुतार, पालिका आयुक्त डॉ रामास्वामी एन, यांच्यासह पालिकेचे पदाधिकारी तसेच सर्वपक्षीय नगरसेवकांनी, अधिकार्यांनी पालिका कर्मचारी-अधिकार्यांसाठी सातवा वेतन आयोग लागू करण्यास मंजूरी दिली याबददल या सर्वाचे श्रमिक सेनेच्या वतीने आही आभार मानतो. लोकनेते गणेश नाईक यांनी सुचित केल्याप्रमाणे हा न्याय मिळाला आहे त्यांचे देखील श्रमिक सेना युनियनच्या वतीने आभार व्यक्त करतो. पालिकेनंतर एनएमएमटीतील कर्मचारी-अधिकार्यांसाठी देखील सातव्या वेतन आयोगाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी आमची मागणी आहे. सातवा वेतन आयोग लागू झाल्याने यापुढे पालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी नवी मुंबईकरांना आणखी चांगली सेवा देतील, असा विश्वास आहे.
-डॉ संजीव नाईक, अध्यक्ष श्रमिकसेना