नवी मुंबई : साई जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने नेरूळ सेक्टर आठ एल मार्केट परिसरात आयोजित करण्यात आलेले मोफत आरोग्य शिबिर उत्साहात पार पडले. सुमारे १२०० हून अधिक लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला असून ५०० हून अधिक नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नेरूळमधील साई जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने या मोफत आरोग्य शिबिराचे व मोफत चष्मे वाटपाचे आयोजन डी.वाय.पाटील रूग्णालयाच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले होते. साई जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थाचे संस्थापक रतन मांडवे व शिवसेना नगरसेविका तसेच प्रतिष्ठानच्या विश्वस्त सौ. सुनिता रतन मांडवे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली या मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात नाक, कान,घसा व दाताचे डॉक्टरही सहभागी झाले होते. स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख गणेश कुलकर्णी यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी रतन मांडवे, नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शलाका पाजंरी, शुभांगी परब, स्मिता शिवतरकर यांच्यासह शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या तसेच प्रकाश वाघमारे, शरद पाजंरी, शंकर पडवळ, राजू निगडे, भास्कर बागल, गौतम शिरवाळे, राठोड, इप्ते, सागर शिंदे, अमित जाधव, संतोष अभंग, भिकन पाटील, प्रकाश कारभार आदींनी परिश्रम घेतले.