- आमदार संदीप नाईकांनीही संपर्क साधून केली प्रशंसा
- द्विधा मनस्थितीमधील विद्यार्थ्यावर आधारीत कथानक
मुंबई तेजस फाऊंडेशन, नाशिक आयोजित मुंबईतील अंधेरीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी भवन येथे झालेल्या राज्यस्तरीय लघुपट महोत्सवात नेरूळच्या सेंट झेविअर्स हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजने बनविलेल्या ‘ऊर्जा’ या लघुचित्रपटास तृतीय क्रमाकांचे पारितोषिक प्राप्त झाले आहे.
या लघुपटाची निर्मिती प्र्राचार्या मनिषा आंधनसरे व श्राबुनी बॅनर्जी यांनी केली असून दिग्दर्शन विलास वसंत चव्हाण यांनी केले आहे. लघुपटाचे लेखन, कथा व संवाद रईसा कुरेशी यांनी केले आहे. ऊर्जाचे कथानक हे द्विधा मनस्थितीत असलेल्या विद्यार्थ्यांची मानसिकतेवर आधारीत असून यामध्ये सिध्देश सडके, रईसा कुरेशी, योगेश फोरिया, जयश्री एस., पियुष सिंग, सौरभ ठाकुर, श्राबुणी बॅनर्जी, संतोष बोडके, संजय रायचुरकर, संकेत कचरे, अनुराग सिंग, ओम गायकवाड, मयुर इंदुलकर, प्रतिक कुदळे, मयुर चिकणे, प्रसाद जावळे, जयराज मॅथ्यु, अभिनय आव्हाड, रूषी वाघ, प्रतिक रामपुरे, प्राचार्य मनिषा आंधनसरे यांचा समावेश आहे.
तेजस फाऊंडेशनच्या अध्यक्षा मेघा डोळस यांच्या हस्ते देण्यात आलेला ‘ऊर्जा’चा पुरस्कार विलास चव्हाण, रईसा कुरेशी यांनी संयुक्तपणे स्विकारला.
महोत्सवातील परिक्षकांनीही आगळावेगळ्या धाटणीचा विषय निवडल्याबद्दल ऊर्जाच्या टीमची प्रशंसा केली. आमदार संदीप नाईक यांनीही विलास चव्हाण यांना संपर्क करून अभिनंदन केले.