काही भागात कोकणात कुरल्या कीरवी असही म्हणातात
पावसाळ्यात खेकड्याचा रसभरीत रस्सा, कुणाला आवडणार नाही! कोकणातल्या रात्री खेकड्यांसाठी जागतात. खेकड्याचे कालवण, नाग्यांचा रस्सा अगदी भारी! खेकडे पकडण्याची काही विशेष पद्धत आहे. पाठीवर झपकन दाब दिल्यावर खेकड्यावर ताण पडतो. तुम्हांला माहित आहे का? कोल्हा शेपूट बिळात घालतो, ते शेपूट खेकड्याने धरल्यावर तातडीने तो बाहेर काढून दगडावर मारतो. कोल्ह्याची ही नामी युक्ती नक्की कधीतरी पहा. बर्याचदा खेकडे पोकळ असतात, म्हणजे नेमके काय? अमावास्या, पौर्णिमेला हा प्रकार घडतो. भरलेले खेकडे जर ओळखायचे असतील तर त्याची पाठ दाबून पहावी, पाठ वाकत असेल तर ते पोकळ. कित्येकांना खेकडे पकडण्याची भीती वाटते, अशांनी खेकडे पिशवीत बांधून फ्रिजर मध्ये ठेवा, १ तासानंतर बाहेर काढल्यावर ते मंद होतात. खेकड्यांच्या पायात चारच पेशी असल्यामुळे त्यात ताकद नसते. सहज मोडतात. दोन मोठ्या नांग्या मात्र संरक्षणासाठी असतात. खेकड्यांच्या चार हजार पेक्षा जास्त प्रजाती आहेत. त्याला कणा नाही.
खेकड्याला अवयव गाळता येतो. नांगी, पाय काहीही गाळू शकतात. हे गाळलेले अवयव त्यांना पुन्हा येतात. पाठीकडून दाबून धरलेल्या खेकड्यांच्या नांग्यांच्या टोकांना धरूनये, तर मधल्या सांध्याजवळ धरून ते कटकन मोडतात. खेकड्याचे मुख्य कवच काढायचे की नाही, ही ज्याची त्याची आवड असते. खेकडा जर पोकळ असेल तर त्याच्या आत शिरलेलं पाणी चविष्ट असतं. आता तुम्ही म्हणाल, खेकड्याचे उपयोग काय, तर खेकडा बहुगुणी आहे. त्याच्यामद्ये उच्च प्रतीच्या प्रोटीन्सचा पुरवठा शरीराला होतो. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. कोलेस्टरॉलचे प्रमाण कमी होते. कर्करोगाचा धोकाही टळतो. शिवाय मांसल भागात कार्बोहायड्रेटस असल्यामुळे मधुमेहींना खेकडा उत्तम. वजन कमी होतेच पण सांधेदुखीचा त्रासही कमी होतो. हे खूप कमी जणांना माहित आहे. त्यामुळे या पावसाळ्यात खेकड्यांचा झणझणीत रस्सा खायला विसरू नका!
श्री.गणेश अनंत नवगरे
मो.९८६९७१५४१३