नवी मुंबई: देशातील दुसरे राहण्यायोग्य शहर, महाराष्ट्रातील पहिले आणि देशातील सातवे स्वच्छ शहर, स्मार्ट शहर नवी मुंबई आता देशातील सर्वात सुरक्षित शहरांपैकी एक बनणार आहे. माजी गणेश नाईक यांच्या स्मार्ट आणि सुरक्षित शहराच्या धोरणानुसार 25 जून रोजी झालेल्या महापालिकाच्या सर्वसाधारण सभेत नवी मुंबई शहरात 1400 पेक्षा अधिक आधुनिक सीसीटिव्ही कॅमेर्यांची सुरक्षा यंत्रणा बसविण्याचा ठराव मंजूर करण्यात आला, अशी माहिती महापौर जयवंत
सुतार यांनी दिली.
या पार्श्वभूमीवर नेरूळ पश्चिच्या शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी आपल्या प्रभागातील सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्वप्रथम पाऊल उचललेे आहे. त्यांनी प्रभागातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सर्वखर्चाने सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत केली आहे. रहीवाशांना सोसायटी आवारात व सोसायटी आवाराबाहेर काय घडावे व सुरक्षेला बाधा पोहोचू नये यासाठी नगरसेविका सुनिता रतन मांडवे यांनी प्रभागातील सीसीटीव्ही यंत्रणेला स्वखर्चातून प्राधान्य दिलेे आहेे.
नवी मुंबईतील प्रवेशद्वार, मुख्य चौक, मार्केट, बस डेपो, रेल्वे स्थानकाबाहेरील परिसर, जास्त वर्दळीच्या ठिकाणी सदर सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. जास्त वर्दळीच्या
ठिकाणी देखरेख करण्याकरीता तसेच पामबीच रोड आणि ठाणे-बेलापूर रोड येथील अपघात तसेच वाहनांची गती नियंत्रणासाठी 2012 साली महापालिकाने 282 सीसीटिव्ही कॅमेरे बसविले होते. परंतु, पाच वर्षानंतर त्यांचे जीवनमान संपले. त्यामुळे नवीन अधिक आधुनिक आणि व्यापक अशी सीसीटिव्ही यंत्रणा शहरात स्थापित केली जाणार आहे. नवीन सीसीटिव्ही यंत्रणा शहरातील सर्व एन्ट्री पॉईंटस् म्हणजेच ऐरोलीमुलुंड पुल, ठाणे दिघा रोड, शिळफाटा जंक्शन, वाशी टोल नाका, किल्ले गांवठाण, बेलपाडा या ठिकाणी बसविली जाणार आहे. याशिवाय शहरातील सर्व मुख्य चौकात वाहतूक नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच देखरेखीसाठी सीसीटिव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत.
‘राष्ट्रवादी’चे नेते तथा माजी मंत्री गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईत विकास कामांसह येथील जनतेच्या सुरक्षिततेला देखील प्राधान्य देण्यात आले आहे. येथील छोठे-मोठे घडणारे गुन्हे नियंत्रणात रहावेत यासाठी दूरवर नजर ठेवणार्या कॅमेर्यांची यंत्रणा असावी त्यादृष्टीने आमचे प्रमुख मार्गदर्शक गणेश नाईक यांच्या संकल्पनेतून सीसीटिव्ही सर्वेलन्स यंत्रणा बसविण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. गणेश नाईक यांच्यासोबतच मी महापालिका प्रशासनाचे देखील त्यासाठी अभिनंदन करतो, असे महापौर जयवंत सुतार यांनी सांगितले.
************* *************
नवी मुंबईत पायाभूत आणि इतर सुविधांचा चांगल्या प्रकारे विकास झाला आहे. या सुविधांना आणि त्या ज्यांच्यासाठी निर्माण करण्यात आल्या आहेत, त्या नवी मुंबईकरांना सुरक्षितता प्रदान करण्यासाठी सीसीटिव्ही सुरक्षा यंत्रणा बसविण्यात यावी, अशी माजी मंत्री गणेश नाईक यांची मूळ संकल्पना होती. या यंत्रणेसाठी अर्थसंकल्पात तरतूद केल्यानंतर त्यासंबंधीचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला आहे.
– महापौर जयवंत सुतार.
*****************************