सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : प्रभाग क्रमांक ८६च्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी महापौर जयवंत सुतारांसह महापालिका नेरूळ विभाग अधिकारी संजय तायडेंना प्रभागाची पाहणी करण्यासाठी निमत्रंण दिले.
नेरूळ पश्चिम परिसरात आपल्या प्रभागाच्या विकासासाठी सर्वाधिक लेखी स्वरूपात प्रशासनाकडे पाठपुरावा करणाऱ्या व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दालनात समस्या निवारणासाठी चपला झिजविणाऱ्या नगरसेविका अशी सौ. रूपाली किसमत भगत यांची महापालिका मुख्यालयात प्रशासकीय पातळीवर ओळख आहे. प्रभागातील नागरी समस्यांचे निवारण करण्यासाठी व नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नेरूळ विभाग कार्यालय, महापालिका मुख्यालयातील महापौर व आयुक्तांचे दालन तसेच उपायुक्तांचे दालन या ठिकाणी प्रभागातील विकासकामांसाठी नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश भगत व समाजसेवक रवींद्र भगत सातत्याने आपणास पहावयास मिळतील.
प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही समस्या न सुटल्यास व नागरी सुविधा न मिळाल्यास महापौरांपासून थेट लोकनेते गणेश नाईकांकडे या भगत परिवारांने वेळोवेळी नाराजी व्यक्त करत सत्ता असूनही प्रभागातील कामे होत नसल्याची तक्रारही यापूर्वी केलेली आहे. पावसाळीपूर्व कामांबाबत, प्रभागातील रस्ते, गटरे, पथदिवे, उद्यान, सीसीटीव्ही, पोलीस चौकी व अन्य कामांसाठी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा व चपला झिजविण्याचा एककलमी कार्यक्रम आजही या भगत परिवाराचा सुरुच आहे. नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी महापौर जयवंत सुतार व नेरूळ पालिका विभाग अधिकारी संजय तायडेंना प्रभाग पाहणीचे निमत्रंण दिले आहे.