सुवर्णा खांडगेपाटील : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : राजकीय व सामाजिक वाटचालीमध्ये २५ वर्षे बेलापुर माणसांनी व महिलांनी मला प्रथमपासून साथ दिलेली आहे. एक घरच्यासारखे आमचे नाते आहे. अनेकांनी मला मदतीचे हात दिले व मी काय आजवर काम केले याचे हे साक्षीदार आहेत. माझ्या सुखदु:खाचे हे अडीच दशके सोबती असल्याचे सांगत बेलापुरच्या भाजप आमदार मंदाताई म्हात्रे यांनी आपल्या सहकाऱ्यांबाबत कृतज्ञता व्यक्त केली.
श्री. गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या वतीने बेलापुर येथील वारकरी भवनात ‘मंगळागौरी महिला महोत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रास्तविकपर भाषण करताना आमदार मंदाताई म्हात्रेंनी विनम्रतापूर्वक अडीच दशकातील वाटचालीमधील आपल्या सहकाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
बेलापुरमधील सरदार (शीख) लोकांनी प्रथमपासून माझ्यावर विश्वास दाखविलेला आहे. १९९५ साली झालेल्या नवी मुंबई महापालिकेच्या पहिल्या निवडणूकीत मला निवडून आणण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. २५ वर्षे माझ्यासोबत ते आहेत व आमच्या प्रत्येक कार्यक्रमात ते हक्काने सहभागी होत असल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी व्यासपिठावर भाजपचे पदाधिकारी विजत घाटे, डॉ. राजेश पाटील, दत्ता घंगाळे, सुहासिनी नायडू, भाजपचे विस्तारक वसंत पवार, नगरसेवक सुनिल पाटील, दीपक पवार, माजी नगरसेविका सरस्वती पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
आ. मंदाताई म्हात्रे या नेहमीच महिलांसाठी कार्यक्रम राबविताना प्रथा, परंपरांना व संस्कृती जतनाला प्राधान्य देत असल्याचे डॉ. राजेश पाटील आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, कार्यक्रम कसे असावे व ते कसे राबवावेत ते आपण ताईंकडून शिकलो. ताई अधिकाधिक कार्यक्रम राबवितांना महिलांना प्राधान्य देत असतात. महिलाही या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होत असतात. महिलांसाठी कसे काम करावे याचे उत्तम उदाहरण ताई आहेत. कसे कार्यक्रम ठेवावेत व महिलांना कार्यक्रमासाठी बाहेर कसे काढावे याची ताईंना चांगली माहिती आहे. कार्यक्रमात परंपरा जोपासणाऱ्या ताई जनतेसाठी २४ तास उपलब्ध असतात, याचा आपणास अभिमान आहे.ताई आजही आमदार आहेत, उद्याही असणार. त्यांना आपल्याला निवडून द्यायचे आहे. त्या दिसव-रात्र काम करतात. गाव व कॉलनीला त्यांनी कामातून न्याय दिला आहे. हे विकासपर्व नवी मुंबईत केवळ ताईंनी केले आहे. मंत्रालयाच्या माध्यमातून ताईंनी अनेक कामे तडीस नेलेली आहेत. मंत्रालयात जाण्यास अनेकदा आम्ही थकतो, पण ताई थकत नाहीत. आपल्या भागात मतदारनोंदणी करून ताईचे हात भक्कम करावेत. ताई आपला अभिमान आहे. हा अभिमान जतन करण्यासाठी सर्वांनी ताईच्या मागे उभे राहावे असे आवाहन डॉ. राजेश पाटील यांनी उपस्थितांना केले.
हा आपला घरातला कार्यक्रम असल्याचे सांगून पंजाब कल्चरल असोसिएशनचे यशपाल शर्मा पुढे म्हणाले की, गेली ३० ते ४० वर्षे आम्ही ताईसोबत आहोत. ताई जिकडे, आम्ही तिकडे राहणार. आम्हाला पक्ष माहिती नाही तर केवळ ताई माहिती असल्याचे त्यांनी यावेळी सांगतले.
माझी आई गेल्यावर आम्ही मंगळागौरच विसरून गेलो, पण ताईमुळे आज पुन्हा त्याची आठवण झाल्याचे सांगून विजय घाटे ऊर्फ माऊली आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, मंगळागौरीची घरी पुजा करताना घराचे सुखसमृध्दीसाठी प्रार्थना केली जाते. अच्छे दिन नक्कीच येणार. ताई नवी मुंबईच्या विकासासाठी प्रार्थना करत आहे. आता मंगळागौर सुरू आहे, पण आमचा लवकरच शिमगा सुरु होणार आहे. आपणास ताईने केलेली विकासकामे घरोघरी पोहोचवावी लागणार असल्याचे विजय घाटे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी गोवर्धंनी संस्थेच्या माध्यमातून ताईंसोबत सदोदीत २५ वर्षे असणाऱ्या महिलांचा सत्कार करत आमदार मंदाताई म्हात्रेंनी पुन्हा एकवार त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी सुषमा कदम, शिल्पा पाटील, आरती राऊल, देवयानी मुकादम, सुमन डोंगरे, रंजना जांभळे, कांचन फलके, मृदृला शेख, अलका कामत, सुरेखा बामणकर, मनीषा मनोरे, अर्चना कोळी, शकुंतला शर्मा, वैशाली म्हात्रे,फरजादना बागवान यांचा सत्कार करण्यात आला. आ. मंदाताई म्हात्रेंना राज्य सरकारकडून उत्कृष्ठ संसदपटू म्हणून पुरस्कार मिळाला, त्याबाबत उपस्थित महिलांकडून आ. मंदाताई म्हात्रेंचा सत्कार करण्यात आला. आ. मंदाताई म्हात्रेंकडून मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणाऱ्या राख्या बनविणाऱ्या जयश्री चित्रेंचाही सत्कार करण्यात आला. शैलजा पाटील, लीना म्हारके यांचा विशेष सत्कार आ. मंदाताई म्हात्रेंकडून करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन करताना ताईंचा आनंद पाहण्यासारखा असल्याचे सांगून समारोपाचे भाषण करणाऱ्या शैलजा पाटील पुढे म्हणाल्या , ताईंकडून सतत आम्हाला जिव्हाळा व प्रेम, आपुलकी मिळाली. १९९५ च्या पालिका निवडणूकीत ताईंचे रूप आम्ही पाहिले. त्या प्रेमात आम्ही पडलो व आजही ते प्रेम कायम आहे. आज घरातील माणसात भांडणे होतात. पण या २५ वर्षात आमच्यात व ताईमध्ये कधीही वाद झाले नाहीत. ताईंनी नेहमीच आम्हा सर्वांना सांभाळून घेतले आहे. १९९५ साली ताई नाहीतर आम्ही नगरसेविका झाल्याचा आम्हाला अभिमान होता. ताईच्या कोणत्याही कार्यक्रमात आम्ही सहभागी होतो. आमच्या घरच्यांनी कधीही आम्हाला अडविले नाही. ताईचा कार्यक्रम हा आमच्यासाठी कौंटूबिक सोहळा आहे. मंदाताई आमच्यासाठी आमदार नसून मोठी बहींण आहे. आजवर ताईने आम्हाला मोठ्या बहीणीसारखे सांभाळून घेतले आहे.आमच्या सुखातच नाही तर ताई दुखातही आमच्यासोबत राहील्या आहेत. आम्ही आज तर ताईसोबत आहोत, पण अखेरच्या श्वासापर्यत ताईच्या सोबत कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर मंगळागौर कार्यक्रमास सुरुवात झाली.
- ताईचा उखाणाही विरोधकांचा थरकाप उडविणारा…
भाजप पदाधिकारी विजय घाटे यांनी मंगळागौर कार्यक्रमात उखाणा घेण्याची परंपरा असल्याचे सांगत आमदार मंदाताई म्हात्रेंना उखाणा घेण्याचा आग्रह केला. त्यावेळी मंदाताई म्हात्रें यांनी घेतलेला उखाणा म्हणजे नजीकच्या काळात त्यांच्या राजकीय विरोधकांची थरकाप उडविणार असल्याचा नकळत संदेश देवून गेला.
- आमदार मंदाताईंचा उखाणा
चांदीच्या पाटासमोर सोन्याचे ताट
विजयरावांचे नाव घेते
लवकरच लावणार विरोधकांची वाट