सुजित शिंदे : 9619197444
आज भारतात वैद्यकीय सेवा दिवसेंदिवस प्रचंड महाग होत चालल्या आहेत. तसेच अनेक नवनवीन आजार वाढल्याचे दिसत आहेत. कॅन्सर, डायबिटीस, हार्ट अॅटॅक, बीपी याचेही प्रमाण वाढले आहेे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात बालमृत्यूचे प्रमाण वाढले आहेे. जगभरातील बालमृत्यूपैकी सुमारे 26 टक्के बालमृत्यू भारतात होतात, याचे मुख्य कारण म्हणजेे योग्य वैद्यकीय सुविधेचा अभाव तसेच डॉक्टर उपलब्ध न होणे हे होय.
आज भारतात सुमारे 8 लाख डॉक्टर्सची कमतरता आहेे. भारतात एम.बी.बी. एस डॉक्टरांच्या शिक्षणासाठी 72 हजारच जागा उपलब्ध असतात. त्यामुळे दरवर्षी फक्क्त 72 हजार विद्यार्थीच एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेवू शकतात व नीट या प्रवेशपरिक्षेसाठी बसलेेले उर्वरित लाखो विद्यार्थी डॉक्टर होण्याचे आपले स्वप्न पूर्ण करू शकत नाहीत.
या वर्षी सुमारे 15 लाख 30 हजार विद्यार्थ्यांनी ‘नीट’ ही प्रवेश परिक्षा दिली. त्यापैकी सुमारे 7 लाख 95 हजार विद्यार्थी उत्तीर्ण झालेे. आता त्यापैकी फक्त 72 हजार विद्यार्थ्यांनाच भारतातील मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश घेता येईल. (यामध्ये सर्व सरकारी, खासगी, डीम्ड कॉलेजेस यांचा समावेश आहे.) मग उरलेेल्या 7 लाख 23 हजार विद्यार्थ्यांनी काय करायचे? हा प्रश्न निर्माण होेतो.
शिवाय आणखी एक महत्वाची बाब म्हणजे फी! प्रायव्हेट! डीम्ड कॉलेजमध्ये एमबीबीएस होण्याचे बजेट 80 लाख रूपयापासून ते 1 कोटी 25 लाख रूपयांपर्यतचे आहेे.शिवाय पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन करावयाचे असल्यास पुन्हा तितकाच पैसा खर्च होतो. हे सर्व हुशार परंतु सर्वसामान्य व मध्यम कुटूंबातील विद्यार्थ्यांच्या आवाक्याबाहेर आहेे.
त्याचप्रमाणे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिकविणार्या प्राध्यापकांचीदेखील वानवा आहे. काही ठिकाणी प्राध्यापकाचा स्तरदेखील खालावलेेला दिसतो.
अशा निराशाजनक वातावरणामध्ये परदेशात एमबीबीएस (म्हणजेे तेथील एमडी) करणे हे जास्त व्यावहारिक व योग्य ठरते. तेथील उच्चविद्याविभूषित प्राध्यापक, उत्तम शिक्षण पध्दती, 12 विद्यार्थ्यांमागे एक प्राध्यापक, अद्ययावत तंत्रज्ञान शिकता येणे या बाबीही महत्वाच्या ठरतात. तेथील कमालीची सुरक्षितता, नियमांचे काटेकोर पालनदेखील महत्वाचे ठरतात. कॉलेजच्या डीम व तत्सम मंडळींचे बहूतेक विद्यापिठांमध्ये वैयक्तिक लक्ष असते. म्हणजे विद्यार्थ्यांना ‘दांडी’ मारता येत नाही.‘सेल्फ स्टडी’ व आकलन यावर भर दिला जातो. बहूतेक ठिकाणी एक दिवसा आड किंवा आठड्यातून एकदा परिक्षा घेतल्या जातात. राहण्यासाठी दिलेेल्या हॉस्टेल्सची उत्तम सुविधा असते. बर्याच ठिकाणी भारतीय जेवणही उपलब्ध होेते. कारण भारतीय विद्यार्थ्यांची दिवसेंदिवस वाढत चाललेेली संख्या, हे होय. बहूतेक देश मुलींच्या दृष्टीने संपूर्णत: सुरक्षित आहेेत. थंड हवेपासून संरक्षण करण्यासाठी जागोजागी हिटर्स बसवलेेलेे आढळतात. एकंदरीत भारतीय मुले परदेशातील नव्या जगात रममाण झालेेली दिसत आहेेत. तरीदेखील दरवर्षी सरासरी 5 हजारच विद्यार्थी परदेशात डॉक्टर बनण्यासाठी जातता. फी परवडत नसल्याने मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत याकरिता केंद्र शासनाने ‘विद्यालक्ष्मी’ योजनेतंर्गत बँकांना शैक्षणिक कर्ज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना देण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतीत विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्याशी योग्य चर्चा करून निर्णय घेणे व कर्जाची परतफेड पाल्यानेच करावयाची आहे, हे त्याच्यावर ठसवणेे आवशयक आहे. असे झाल्यास अधिक संख्येने विद्यार्थी परदेशात शिक्षण घेवून डॉक्टर बनतील व भारतात परत येवून येथील रूग्णांची सेवा करतील, यात शंका नाही.
हेच स्वप्न उराशी बाळगून ‘अभिनव’ अॅकॅडमी, नवी मुंबई ही संस्था या क्षेत्रात कार्यरत आहेे व हे काम ‘सॉॅफ्टो’ एज्युकेशन सर्व्हिसेस प्रा.लि नवी दिल्ली यांच्या सहकार्याने करत आहे. अशी भारतात 22 व परदेशात 3 ठिकाणी नोंदणीकृत कार्यालये आहेत. अधिक माहितीसाठी 8108748048 संपर्क साधावा.