सुजित शिंदे : ९६१९१९७४४४/navimumbailive.com@gmail.com
नगरसेविका रूपाली भगतांचे पालिका आयुक्त, महापौरांना साकडे
नवी मुंबई : प्रभाग ९६ मधील नेरूळ सेक्टर १६ ए मधील सिडकोकालीन रिध्दी-सिध्दी मार्केट व त्यालगतच्या मार्केटच्या समस्यांमुळे आलेली दुरावस्था, दुर्गंधी दूर करण्याची मागणी स्थानिक नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, महापौर जयवंत सुतार, विभाग अधिकारी संजय तायडे यांच्याकडे केली आहे.
नेरूळ सेक्टर १६ए मध्ये सिडकोकालीन रिध्दी सिध्दी मार्केट आहे. त्यालगतच सिडकोचे अजुन एक मार्केट आहे. या मार्केटच्या संरक्षक भिंतीची दुरावस्था झाली असून ही भिंत जागोजागी पोखरली गेली असून यातून बाहेर निघणारी माती पदपथावर विखुरली गेली आहे. स्थानिकांना पदपथावरून ये-जा करण्यास अडथळे निर्माण होत आहे. या मार्केटच्या चढउतार करण्यासाठी असलेेल्या पायर्याही तुटल्या असून फरशा (लाद्या) बाहेर आल्या आहेत. यामुळे अनेकांच्या पायाला जखमा झाल्या असून काही महिला पडल्याही आहेत. येथे वारंवार दुर्घटना होत असून जखमी होण्याच्या घटना घडत असल्याचे नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
या दोन्ही मार्केटच्या मागील बाजूस दुरावस्था झाली असून दुर्गधी वाढत चालली आहे. त्या ठिकाणी ये-जा करणारे रात्रीच्या अंधारात लघुशंका करत असल्याने आहे त्या दुर्गंधीत वाढ होत असून रोगराईला निमत्रंण मिळत आहे. तेथे मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता आहे. घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. आपण त्या ठिकाणी भेट दिल्यास आपणास समस्येचे गांभीर्य निदर्शनास येईल. लवकरात लवकर या मार्केटची डागडूजी, संरक्षक भिंतीचे काम, सभोवतालच्या आवारातील स्वच्छता, पायर्यांची दुरूस्ती करण्याचे संबंधितांना निर्देश द्यावेत अशी मागणी नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.