अॅड. महेश जाधव : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने तसेच संसर्ग वाढल्यास त्याकरिता आवश्यक नियोजन करण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दूरगामी विचार करीत महानगरपालिकेच्या विभागप्रमुख व अधिकाऱ्यांकडे प्रमुख जबाबदाऱ्या सोपवित महानगरपालिका अधिकाऱ्यांचा टास्क फोर्स निर्माण केला आहे.
तशाप्रकारचा आदेश जारी करण्यात आला असून यामध्ये महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी रुग्णालये तसेच सेवाभावी संस्था यांच्या समन्वय साधून आयसोलेशन वॉर्ड तसेच क्वारंटाईन इन्स्टिट्युशन तयार करण्यासाठी नियोजन करण्याचे काम अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांच्याकडे सोपविण्यात आलेले आहे.
सेवाभावी संस्थांकडून क्वारंटाईन व्यक्ती आणि अत्यावश्यक सेवेत कार्यरत व्यक्ती यांच्या करिता अन्नपदार्थ उपलब्ध करून घेण्याची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त महावीर पेंढारी यांच्याकडे सोपविण्यात आलेली आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासंदर्भात केंद्र शासन, राज्य शासन, विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याशी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने समन्वय राखणे, त्यांना विविध माहिती उपलब्ध करुन देणे तसेच या संदर्भातील बैठकांना उपस्थित राहणे, महानगरपालिकेच्या विविध विभागात याबाबत समन्वय राखणे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत तात्पुरते रूग्णालय तयार करण्याच्या दृष्टीने पूर्वनियोजन करण्यासाठी मिलेटरी / पॅरा मिलेटरी संस्थांशी समन्वय साधणे आदी कामांची जबाबदारी उपआयुक्त अमोल यादव यांचेकडे सोपविण्यात आलेली आहे.
कोरोना विषांणूचा प्रसार रोखण्याकरिता महानगरपालिका क्षेत्रातील संपूर्ण वैद्यकिय परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे. तसेच वेळोवेळी अहवाल सादर करणे याबाबतची जबाबादारी वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब सोनावणे यांच्याकडे असणार आहे.
महापालिकेच्या सर्व कार्यालयांच्या बाहेर, रस्त्यावरील सार्वजनिक शौचालयांच्या बाहेर हात धुण्यासाठी वॉश बेसीन बसविणे व त्या ठिकाणी हॅन्डवॉश सुविधा उपलब्ध करून देणे तसेच महापालिका क्षेत्रात नागरिकांचा पाणीपुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घेणे आणि शहरामध्ये पदपथ दिवे / सी.सी.टी.व्ही. कॅमेरे सुस्थितीत चालू राहतील याची काळजी घेणे तसेच मलनि:स्सारण यंत्रणा काटेकोरपणे काम करेल याची दक्षता घेणे याबाबतची जबाबदारी शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांची असणार आहे.
कोरोना विषांणूचा प्रसार रोखण्यासंदर्भात केंद्र शासन, राज्य शासन, विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत निर्गमित होणाऱ्या आदेशांची अंमलबजावणी करणे, क्वारंटाईन सेंटरचे / होम क्वारंटाईन असलेले नागरिक आदेशाची अंमलबजावणी करीत नसल्यास पोलीस विभागाशी समन्वय साधून पुढील उचित कारवाई करणे. त्याचप्रमाणे कोव्हीड – 19 चे प्रिव्हेशन व कन्टेटमेन्ट मेजर्सचे आदेश वेळोवेळी निर्गमित करणे तसेच कोव्हीड – 19 करीता अत्याधूनिक सॉफ्टवेअर तयार करणे आदी कामांची जबाबदारी उप आयुक्त डॉ. अमरीश पटनिगीरे यांचेकडे सोपविण्यात आलेली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात क्वारंटाईन सेंटरकरीता / आयसोलेशन वॉर्डकरीता आवश्यक त्या खाटांच्या (बेड) संख्येप्रमाणे जागा निश्चित करुन तेथे आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करुन घेणेबाबतचे काम उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी पहावयाचे आहे.
आपती व्यवस्थापन विभागाकडील डॅश बोर्ड मॉनिटर करण्यासाठी प्रत्येक शिफ्टमध्ये दोन या प्रमाणे प्रतीदिन सहा कर्मचारी उपलब्ध करून देणे. तसेच आपती व्यवस्थापन विभागाकरीता आवश्यकतेनुसार कर्मचारी उपलब्ध करून देणे विषयक कामकाजाची जबाबदारी उपआयुक्त किरणराज यादव यांची असणार आहे.
क्वारंटाईन सेंटर येथे दाखल होणाऱ्या रुग्णांकरीता पिण्याचे शुध्द पाणी, चहा, अल्पोपहार व भोजन व्यवस्था करणे, तसेच दाखल होणाऱ्या रूग्णांना साबण, हॅन्डवॉश, टॉवेल, सॅनिटायझर इ. आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे. त्याचप्रमाणे कृषि उत्पन्न बाजार समिती (APMC) शी समन्वय साधून शहरामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कमी पडणार नाही याची दक्षता घेणे (उदा. दूध, फळे, भाजीपाला, अन्नधान्य इ.) याबाबतची जबाबदारी उपआयुक्त श्री. नितीन काळे यांचेकडे सुपर्द करण्यात आलेली आहे.
कोव्हीड – 19 चा रूग्ण आढळल्यास किंवा कंटेंमेंट सर्वेक्षणांतर्गत त्या परिसरातील क्षेत्रात गुगल अर्थ / ऑटोकॅडचा आरोग्य विभागास उपलब्ध करून देणेबाबतची जबाबदारी सहाय्यक संचालक नगररचना हेमंत ठाकूर यांची असणार आहे.
महानगरपालिका कार्यक्षेत्रातील गर्दीच्या ठिकाणी नियमित साफ-सफाई स्वच्छता करुन घेणे तसेच शहरामध्ये आवश्यकतेनुसार निर्जंतुकीकरण फवारणी करणे बाबतची कार्यवाही घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त तुषार पवार यांनी पार पाडावयाची आहे.
आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास योग्य नियोजनार्थ आशा वर्कर्स्, समुहसंघटक, अंगणवाडी सेविका व नागरी संरक्षण दल यांना पॅरा मेडीकल प्रशिक्षण देऊन पर्यायी पॅरा मेडीकल कर्मचारी दल तयार ठेवण्याची जबाबदारी उपआयुक्त श्रीम. क्रांती पाटील यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे.
कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासंदर्भात करावयाच्या उपाययोजनांकरीता महापालिका क्षेत्रातील मोठे उद्योजक यांचेकडून सी.एस.आर. फंडातून विविध प्रकारचे साहित्य व मदत मिळवणे करीता संबंधित प्रायोजकांशी समन्वय साधण्याची जबाबदारी इ.टी.सी. संचालक डॉ. वर्षा भगत यांच्याकडे सोपविलेली आहे.
महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शासकीय वाहने, नवी मुंबई महानगरपालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील वाहने व आपत्ती व्यवस्थापनासाठी नियुक्त केलेली नवी मुंबई महानगरपालिकेची व पोलीसांची वाहने यांचे व्यतिरिक्त अत्यावश्यक सेवेतील वैयक्तिक दुचाकी / चारचाकी वाहनांना फिरण्यास परवानगी पासेस देणे. महापालिका क्षेत्रामध्ये आवश्यक असलेल्या सेवा सुरू ठेवण्याच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या सेवा पुरविणाऱ्या संस्थांना त्यांचे कर्मचारी ने – आण करणेकरीता वापरण्यात येणाऱ्या वाहनांना परवानगी पास देणे आदी कामांची जबाबदारी परिवहन व्यवस्थापक श्री. शिरिष आरदवाड यांच्याकडे सोपविण्यात आलेली आहे.
महत्वाच्या काळात रक्त साठा कमी पडू नये याकरिता सर्व रक्तपेढी यांच्यासोबत समन्वय साधून प्रत्येक रक्त गटाच्या साठयाबाबत माहिती अद्ययावत ठेवणे व आवश्यकता असल्यास नागरिकांना व्यक्तीश: बोलवून रक्तदान करून घेण्याची जबाबदारी वैद्यकिय अधिक्षक डॉ. प्रशांत जवादे यांची असणार आहे.
कोव्हीड – 19 करीता आवश्यक असलेली वैद्यकिय उपकरणे तसेच औषधांचा साठा, मास्क, हॅन्ड ग्लोव्हज, हँन्ड सॅनिटायझर, व्हेंटीलेटर, ऑक्सीजन सिलेंडर इ. साहित्य उपलब्ध करून वितरीत करण्याची जबाबदारी वैद्यकिय अधिकारी डॉ. रत्नेश म्हात्रे यांच्याकडे सोपविण्यात आलेली आहे.
रॅपीड ॲक्शन टीमचे नियंत्रण तसेच होम कॉरंटाईन, इंन्स्टिट्युशनल कॉरंटाईन, आयसोलेशन वॉर्डवर नियंत्रण ठेवणे, त्याचप्रमाणे कोव्हीड – 19 चा रूग्ण आढळल्यास त्या परिसरात 3 कि.मी. च्या सर्वेक्षणावर नियंत्रण ठेवणे. नागरी आरोग्य केंद्रामार्फत कोव्हीड – 19 करीता होत असणाऱ्या सर्व कामकाजावर नियंत्रण ठेवणे तसेच सॉफ्टवेअरव्दारे प्राप्त झालेली माहिती यावर नियंत्रण ठेवणे व योग्य उपाययोजना करण्याची जबाबदारी वैद्यकिय अधिकारी डॉ. उज्वला ओतुरकर यांच्याकडे सोपविण्यात आलेली आहे.
कोव्हीड – 19 संबंधित शासन स्तरावर पाठविण्याचे अहवाल तयार करणे व पाठविणे. आयसोलेशन वॉर्डचे नियोजन करणे व तयार करणे आदी कामे वैद्यकिय अधिकारी डॉ. धनवंती घाडगे यांच्याकडे सोपविण्यात आलेले आहे.
कोव्हीड – 19 संदर्भात घेण्यात आलेले महत्वाचे निर्णय, उपाय योजना, महानगरपालिका या संदर्भात करीत असलेली कर्यावाही यांची माहिती प्रसार माध्यमांमार्फत नागरिकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी माहिती व जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे यांची असणार आहे.
कोव्हीड – 19 चा प्रसार रोखण्यासाठी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली परिस्थितीत नियंत्रणात रहावी यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येत आहेत.
यामध्ये नागरिकांचे सहकार्य सर्वात महत्वाचे असून कोरोनाचा विषाणू संसर्गाव्दारे पसरत असल्याने परदेशातून प्रवास करून आलेल्या प्रवाशांनी अलगीकरण (कॉरंटाईन) करून राहणे तसेच इतर सर्व नागरिकांनी स्वत:च्या घरातच राहून संसर्ग टाळणे अत्यंत गरजेचे आहे. केंद्र व राज्य शासनाने याकरिता ३१ मार्च पर्यंत लॉकडाऊन जाहिर केला असून नागरिकांनी या काळात आपल्या घरातच राहून कोरोनाचा प्रसार रोखावा व आपल्या स्वत:च्या आणि इतरांच्या आरोग्याचे रक्षण करावे असे आवाहन महापौर जयवंत सुतार व महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.