प्रभाग ८५च्या सारसोळेच्या उच्चशिक्षित नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटलांच्या परिश्रमाला यश
नवी मुंबई : सोशल मिडियाच्या काळात १० पैशाची समाजसेवा करून व्हॉटसअप, फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून करोडो रूपयांची प्रसिध्दी मिळविणाऱ्या चमकेश प्रवृत्तींच्या महापुरात महापालिका प्रभाग ८५च्या कुकशेत-सारसोळे आणि नेरूळ सेक्टर सहाच्या उच्च शिक्षित वाणिज्य शाखेच्या द्विपदवीधर असलेल्या नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील यांचे आगळेवेगळे कार्य उल्लेखनीय ठरत असून नेरूळ पश्चिम नोडमधील सेक्टर दोनच्या या कोपऱ्यापासून सेक्टर २८च्या शेवटच्या कोपऱ्यापर्यत त्यांच्या कार्याची जनसामान्यांतून प्रशंसा होत आहे. पाच वर्षापूर्वी झालेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत दिलेल्या वचननाम्यातील कामाची पूर्तता तर त्यांनी केलीच, परंतु नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटलांनी याशिवाय प्रभागातील अन्य कामांना गती देताना नवी मुंबईतील ग्रामस्थांच्या चालीरिती, उत्सव, उपजिविका, राहणीमान याची नवी मुंबईसारख्या विकसित शहरात रहावयास येणाऱ्या बिगर ग्रामस्थांनाही परिचय व्हावा यासाठी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून मंजुर करून घेतलेले ‘आगरी-कोळी संस्कृती दर्शक शिल्प’ आज जवळपास पूर्णावस्थेत आले असून लवकरच त्याचा लोकार्पण सोहळा होणार असल्याची माहिती तळागाळातील जनसामान्यांची आस्थेवाईकपणे काळजी घेणारे भाजपाचे युवा नेतृत्व व माजी नगरसेवक सुरज बाळाराम पाटील यांनी दिली.
सौ. सुजाताताई सुरज पाटील यांच्या माध्यमातून कुकशेत गाव, सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहाला महापालिका स्थापनेनंतर प्रथमच खऱ्या अर्थाने उच्चशिक्षित नेतृत्व लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून लाभले. शिकलेल्या माणसांनी राजकारणात का यावे याचे उत्तर सौ. सुजाताताई सुरज पाटलांनी आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात आपल्या कामातून दिले आहे. नेरूळ नोडमधील अधिकाधिक नगरसेवक सोशल मिडियावर प्रसिध्दीचे चक्क ‘माफियाच’ बनले असताना सौ. सुजाताताई सुरज पाटलांनी सोशल मिडियापासून जाणिवपूर्वक चार हात लांब राहत जनसंपर्कावर व जनसमस्या निवारणावर भर दिला. सुरूवातीच्या काळात काहीशा मितभाषी असणाऱ्या सौ. सुजाताताई सुरज पाटलांची सभागृहातील व सभागृहाबाहेरील जनसामान्यांसाठी राबणारी कार्यप्रणाली मात्र बोलकी ठरली. त्यामुळे सोशल मिडियाची प्रसिध्दी ही क्षणिक असते, तर लोकांची केलेली कामे कायमस्वरूपी त्यांच्या मनावर बिंबतात हे नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटलांनी कृतीतून सिध्द करताना सभोवतालच्या सोशल मिडियावर सक्रिय असणाऱ्या सर्वच लोकप्रतिनिधींच्या डोळ्यात अंजन घातले.
सौ. सुजाताताई सुरज पाटलांच्या प्रभागात कुकशेत गाव, सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहा या परिसराचा समावेश होत आहे. एक कॉलनी, एक नियोजित गाव तर काही प्रमाणात अविकसित परंतु समस्यांच्या विळख्यात अडकलेले गाव, अशा त्रिकोणी परस्परविरोधी परिसराचे प्रतिनिधित्व करताना नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटलांनी खऱ्या अर्थाने अग्निपरिक्षा दिली. सारसोळे गाव हे नवी मुंबईतील खऱ्या अर्थाने परंपरा जोपासणारे गाव. नवी मुंबईतील अन्य गावांतील कोळीवाडे इमारतींचे जंगल बनत असताना सारसोळेच्या कोळीवाड्यात आजही पारंपारिक घरे पहावयास मिळतात. सारसोळे गाव अन्य गावांच्या तुलनेत आर्थिकदृष्ट्या गरीब असून येथील ग्रामस्थांची आजही खाडीतील मासेमारीवर उपजिविका अवलंबून आहे.
सौ. सुजाताताई सुरज पाटील यांनी महापालिका प्रशासन दरबारी केलेल्या अथक पाठपुराव्यामुळे आज सारसोळे कोळीवाड्यात प्रवेश करताना कै. बुध्या बाळ्या वैती मार्गावर कोळीवाडा प्रवेशद्वाराचे काम सुरू आहे. याशिवाय सारसोळे गावातील ग्रामस्थ दररोज उपजिविकेसाठी खाडीत मासेमारी करण्यासाठी जातात. नवी मुंबईतील अनेक गावांमध्ये संस्कृती, चाली रिती लोप पावत असताना सारसोळे गावात मात्र आजही नारळी पौर्णिमेला पालखी, खाडीला नारळ अर्पण, खाडीअंर्तगत भागातील बामणदेवाचा भंडारा, आगरावर चालणारी मत्स्य शेती हे पहावयास मिळते. या गावाचे महापालिकेत प्रतिनिधीत्व करण्याचे भाग्य आपल्याला लाभल्याबाबत नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील या नेहमीच खासगीत तसेच जाहीर संभाषणातही सारसोळेच्या ग्रामस्थांबाबत कृतज्ञता व्यक्त करतात.
खाडीत चालणारी मासेमारी, नारळी पौर्णिमेचा उत्सव, आगरी-कोळी ग्रामस्थांचे उत्सव, चालीरिती, परंपरा याचे दर्शन आगामी काळातही सर्वाना पिढ्यानपिढ्या व्हावे, संस्कृतीचे दर्शन इतरांना वेळोवेळी व्हावे, बाहेरून येणाऱ्या समाजाला येथील स्थानिकांची माहिती मिळावी, नवी मुंबई वसविण्यात त्यांनी केलेल्या त्यागाची महती समजावी यासाठी पामबीच मार्गावर सारसोळे जेटी चौकात एका कोपऱ्यावर ‘आगरी कोळी संस्कृती दर्शक शिल्प’ महापालिका प्रशासनाकडून उभारले जावे यासाठी नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटलांनी पोटतिडकीने प्रशासन दरबारी व सभागृहातही पाठपुरावा केला. योगायोगाने सभागृहात महापौर म्हणून जयवंत सुतार हेही नवी मुंबईतील ग्रामस्थच असून विकसित नवी मुंबईची जडणघडणही त्यांनी जवळून पाहिली आहे. नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटलांच्या पाठपुराव्यामागील आत्मियता, भावनिक ओलावा, कळकळ, भूमिकेमागील प्रामाणिकपणा महापौर जयवंत सुतारांच्याही निदर्शनास आला. त्यांनी नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटलांच्या मागणीला न्याय देताना महापौर निधीतून हे शिल्प उभारण्यास मंजुरी दिली.
महापालिका प्रशासनाकडून पामबीच मार्गाला सुरूवात झाली. उच्चशिक्षित नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटलांच्या कामाचे आणखी एक वैशिष्ठ्य प्रभाग ८५ मधील रहीवाशांना मागील पाच वर्षाच्या कालावधीत जवळून पहावयास मिळाले, ते म्हणजे विकासकामांना मंजुरी मिळाली म्हणजे नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटलांचे कार्य थांबत नाही. ते काम पूर्ण होईपर्यत कामाच्या ठिकाणी जावून पाहणी करणे, संबंधितांना सूचना करणे ही त्यांची कार्यप्रणालीच बनली आहे. आज नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटलांच्या पाठपुराव्यामुळे आणि महापौर जयवंत सुतारांच्या सहकार्यामुळे पामबीच मार्गावर सारसोळे जेटी चौकात ‘आगरी कोळी संस्कृती दर्शक शिल्प’ उभारण्यात येत असून ते आता पूर्णावस्थेत आले असून लवकरच महापालिका प्रशासनाकडून या शिल्पाचे नवी मुंबईकरांना लोर्कापण केले जाणार आहे. हा लोर्कापण सोहळा म्हणजे नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटलांच्या कार्यप्रणालीतील मैलाचा दगड ठरणार असून ‘बोले तैसा चाले’ ही त्यांची प्रतिमा जपण्यात त्यांनी परिश्रमाच्या पाठबळावर कायम राखली आहे.