नवी मुंबई : प्रभाग क्रमांक ९६ मधील रहीवाशांकरिता उपयुक्त ठरेल अशा ‘श्रीगणेश दिनदर्शिका २०२१’ दिनदर्शिकेचे प्रकाशन लोकनेते, नवी मुंबईचे शिल्पकार, ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यानंतर जनसेवक गणेश भगत यांनी प्रभाग ९६ मधील नेरूळ सेक्टर १६,१६ अ, १८ परिसरात घरोघरी जावून रहीवाशांना ‘श्रीगणेश दिनदर्शिका २०२१’ दिनदर्शिकेचे वितरण करण्यास सुरूवात केली आहे. रहीवाशांसाठी ५००० दिनदर्शका वितरीत करण्यात येणार असल्याचे गणेश भगत यांनी सांगितले.
रविवारी, दि. २७ डिसेंबरपासून सकाळी प्रभाग ९६ मध्ये जनसेवक गणेश भगत यांनी घरोघरी जावून ‘श्रीगणेश दिनदर्शिका २०२१’ दिनदर्शिका वाटपास सुरूवात केली आहे. यावेळी गणेश भगत यांच्यासमवेत अशोक गाडांळ, शिवाजीराव पिंगळे, अनंत कदम, चंद्रकांत महाजन, गोरशनाथ गांडाळ, रमेश नार्वेकर, शांताराम कुऱ्हाडे, अकुंश माने, हरिश्चंद्र पाताडे, सुरेश बोराटे, सुरेश ठाकूर, संतोष शिंदे, विजय पाथारे, दादाभाऊ लोढे, सागर मोहिते, विमल गाडांळ, रश्मी, सावंत, रंजनी धनावडे, विकास तिकोणे, रवी भगत आदी उपस्थित होते. यावेळी गणेश भगत यांनी घरोघरी जावून दिनदर्शिकेचे वितरण करताना अवघ्या काही तासावर येवून ठेपलेल्या नववर्षाच्या शुभेच्छा रहीवाशांना दिल्या.
प्रभाग ९६ चा नवी मुंबई शहरामध्ये पालिकेने आयोजित केलेल्या स्वच्छता अभियानामध्ये प्रथम क्रमांक आल्याबद्दल रहीवाशी गणेश भगत यांचे व गणेश भगत हे रहीवाशांचे अभिनंदन करताना दिनदर्शिका वितरण करताना पहावयास मिळाले. ‘श्रीगणेश दिनदर्शिका २०२१’ दिनदर्शिका वितरीत करताना गणेश भगत यांनी प्रभागातील जनतेसाठी केलेल्या कामांचीही माहिती रहीवाशांना देण्यात आली आहे. प्रभाग ९६ मध्ये गेल्या १५ ते १६ वर्षात जिथे डांबरीकरण झाले नव्हते, त्या ठिकाणी सौ. रूपाली किस्मत भगत यांनी डांबरीकरण करवून घेतले. कोरोना काळात प्रभागात मुषक नियत्रंण कार्यक्रम, सोसायटी आवारात ब्लिचिंग पावडरची फवारणी, सोसायटीतील मल:निस्सारण वाहिन्यांची सफाई, विभागात प्रथमच रस्त्यारस्त्यावर, चौकाचौकात सोसायटीच्या नावांचे फलक नगरसेवक निधीतून बबसविण्यात आले. घरोघरी जावून रहीवाशांना दिपावली भेट देण्यात आली. आदिवासी बांधवानांही दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. कोरोना काळात रहीवाशांची काळजी घेताना प्रभागात मास स्क्रिनिंग शिबिराचे, अॅण्टीजेन टेस्टचे आयोजन, मोफत रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. कोरोना नियत्रंणात आणताना प्रभागात सॅनिटाईज फवारणी, मोफत धुरफवारणी करताना रहीवाशांच्या आरोग्याची काळजी घेण्यास प्राधान्य दिले. महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करताना नागरी समस्यांचे निवारण करताना नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या. प्रभागातील धोकादायक इमारतींच्या पुर्नवसनासाठी लोकनेते गणेश नाईक, महापालिका प्रशासन व पोलिसांकडेही भगत परिवाराने पाठपुरावा केला. लॉकडाऊनमध्ये परिसरातील रहीवाशांना तसेच अनाथाश्रमामध्ये सातत्याने केलेले धान्य वाटप केले. रहीवाशांना सुविधांचा लाभ मिळावा रहीवाशांना ज्येष्ठ नागरिक कार्ड, मोफत जनआरोग्य कार्ड, एम्पॅलायमेंट कार्डचे वाटप केले. लॉकडाऊन काळात नागरिकांना विरंगुळा भेटावा यासाठी ऑनलाईन चित्रकला, गीतगायन, हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन व पारितोषिक वितरण करण्यात आले. कोरोना महामारीच्या काळात मोफत आर्सेनिक अल्बममधील प्रतिकारक गोळ्या, मोफत फूट स्टेप, सॅनिटायझर स्टॅण्ड वाटप, मोफत मास्क वाटप करण्यात आले. कोरोना महामारीच्या काळात गणेश भगत व नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी केलेल्या कार्याची माहिती दिनदर्शिकेच्या माध्यमातून देण्यात आली आहे.