संदीपखांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२०००९६५७३
Navimumbailive.com@gmail.com
– Sandeepkhandgepatil@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर १५ येथील महानगरपालिकेच्या माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालयाच्या पाहणी दौऱ्यामध्ये आयुक्त अभिजीत बांगर यांनी रुग्णालयाच्या रेकॉर्ड रूममधील अव्यवस्थितपणा बघून तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती व यामध्ये १५ दिवसात सुधारणा करावी अशी सक्त समज दिली होती.
सदर बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक यांनी संबंधित कर्मचाऱ्यांकडून कागदपत्रांची छाननी करून अभिलेख अधिनियमानुसार रेकॉर्ड रूमची अद्ययावत स्वरूपात मांडणी केलेली आहे.
महानगरपालिकेकडील कागदपत्रे हा महत्वाचा दस्तऐवज असून त्या कागदपत्रांचे अभिलेख अधिनियमानुसार योग्य प्रकारे वर्गीकरण व संग्रहण करणे आवश्यक आहे. महानगरपालिकेच्या सर्वच विभागांनी आपल्याकडील कागदपत्रांचा रेकॉर्ड नियमानुसार सुनियोजित पध्दतीने अद्ययावत स्वरूपात ठेवावा असे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.