संदीपखांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२०००९६५७३
Navimumbailive.com@gmail.com
– Sandeepkhandgepatil@gmail.com
नवी मुंबई : रविंद्र इथापे हा नगरसेवक विकास कामांसाठी झपाटलेला असुन त्यांनी कोरोना कालखंडातदेखील विकासकामे मंजुर करून घेतली व या वॉर्डला खऱ्या अर्थाने १०० नंबरी केले. तीन वेळा या वॉर्डला प्रथम क्रमांक मिळवून देणारा हा एकमेव नगरसेवक असुन त्यांच्याकडे ती कला आहे. इथापे दांम्पत्य हे सर्वाच्या सुखदुःखात जाणारे, सर्वाना मदत करणारे आहे. त्यामुळे यापुढेही त्यांना काही अडचण येईल असे मला वाटत नाही. किंबहुना ते चौथ्यांदा रेकॉर्ड ब्रेक करतील असे मला वाटते.या वॉर्डमध्ये त्यांनी आजचा कार्यक्रम पाहता विकासकामांचा सपाटा लावला असल्याचे प्रतिपादम ऐरोलीचे भाजपा आमदार गणेश नाईक यांनी केले.
प्रभाग क्र १०० मध्ये माजी सभागृह नेते तथा माजी नगरसेवक रविंद्र इथापे यांच्या प्रयत्नाने झालेल्या नागरी कामांचा शुभारंभ व दोन उद्यानाचे लोकार्पण आमदार गणेश नाईकसाहेब यांच्या हस्ते तसेच माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी पक्षप्रतोद डॉ. जयाजी नाथ, माजी स्थायी समिती सभापती सौ नेत्रा शिर्के, माजी नगरसेविका सौ. सुरेखा इथापे, माजी नगरसेविका शिल्पा कांबळी, माजी नगरसेवक सुनिल पाटील, माजी परिवहन सभापती प्रदीप गवस, तालुकाध्यक्ष अशोक चटर्जी, तालुका उपाध्यक्ष रविंद्र हांडे, भालचंद्र माने, युवा उपाध्यक्ष कुणाल महाडिक, राहुल इथापे, वॉर्ड अध्यक्ष रविंद्र डेरे, महिला अध्यक्ष सौ. योजना नलावडे, सौ सिमा हांडे, युवा वॉर्ड अध्यक्ष श्रीधर पाटील यांच्या उपस्थितीत संप्पन्न झाला. त्यावेळी आ. गणेश नाईक बोलत होते.
यावेळी नवदुर्गा ते सफलपर्यंत, वंडर्स पार्क ते एमएसईबी पर्यंत,तसेच वंडर्सपार्क ते फायर स्टेशनपर्यंतच्या उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले. निलसिध्दी आम्रमार्ग व वंडर्सपार्कमधील सायकल ट्रॅकच्या तसेच आर.आर.पाटील व सर्व उद्द्यानातील स्प्रिंकलरच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी आमदार गणेश नाईक, नाजी महापौर जयवंत सुतार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी सभागृह नेते रविंद्र इथापे यांनी आपले मनोगते व्यक्त केली. शहरातील व वॉर्डमधील रविंद्र इथापे यांनी केलेल्या कामांचे व कोरोनामध्ये केलेल्या कामांचे सर्वानी कौतुक केले. यावेळेस सर्व सोसायट्याचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.