नवी मुंबई : महापालिका प्रभाग ८२ व ८४ मध्ये पोलिस गस्त वाढविण्याची मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी नेरूळ पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांकडे केली आहे.
महापालिका प्रभाग ८२ व ८४ मध्ये नेरूळ सेक्टर २ व ४ तसेच जुईनगर नोडचा समावेश होतो. या ठिकाणी कोठेही बाह्य वर्दळींच्या मुख्य रस्त्यावर तसेच अंर्तगत रस्त्यावर नेहमीच वाटमारीच्या घटना घडत असतात. नेरूळ सेक्टर चारमधील वाधवा टॉवर ते नेरुळ सेक्टर दोनमधील एलआयजी वसाहत यादरम्यान सकाळी व रात्री मोठ्या संख्येने मॉर्निग वॉकसाठी तसेच रात्री जेवण झाल्यावर पाय मोकळे करण्यासाठी येत असतात. स्वामी समर्थाच्या आश्रमाजवळही दर्शनासाठी गर्दी असते. मुख्य रस्त्यावर तसेच अंर्तगत रस्त्यावर वाहने विशेषत : दुचाकी सुसाट वेगाने जात असतात. अपघात झाल्यास सीसीटीव्ही नसल्याने काहीही अंदाज लागत नाही. अंर्तगत भागात वाटमारीच्याही घटना घडल्या आहेत. परिसरातून दुचाकी चोरीच्या घटनाही झाल्यास आहेत. पोलिसांना आजही तपासात अडथळे येत असतात. या परिसरात अंर्तगत व मुख्य रस्त्यावर पोलिसांची गस्त वाढविल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि गुन्हा – अपघात घडल्यास गस्त वाढविल्याने शोध लवकर लावण्यास मदत होईल. कायदा व सुव्यवस्थेच्या उपयुक्ततेसाठी समस्येचे गांभीर्य पाहता आपण स्थानिक भागामध्ये पोलिसांना दिवसा व रात्री गस्त वाढविण्याचे निर्देश देण्याची मागणी विद्या भांडेकर यांनी केली आहे.