समाजसेविका सुनीता देविदास हांडेपाटील यांचा महापालिका आयुक्तांकडे पाठपुरावा
नवी मुंबई : महापालिका प्रभाग ४२ येथील कोपरखैराणे सेक्टर १६ मधील गतीरोधकावर पांढरे पट्टे मारण्याची मागणी समाजसेविका व भाजपच्या कार्यकर्त्या सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
महापालिका प्रभाग ४२ मधील कोपरखैराणे सेक्टर १६ मध्ये अंर्तगत भागातील रस्त्यावर गतीरोधक आहेत. त्या गतीरोधकांवर पांढरे पट्टे नसल्याने अनेकदा अपघातही झाले आहेत. काही दिवसापूर्वीच सेक्टर १६ मधील प्लॉट क्रमांक ९२ वरील गतीरोधकावर पांढरे पट्टे नसल्याने अपघात झाला होता. गतीरोधकावर पांढरे पट्टे नसल्याने वाहने चालविताना गतीरोधकाचा अंदाज येत नाही. जवळ आल्यावर गतीरोधक समजला तरी वाहन नियत्रंणात आणणे वाहनचालकांना अवघड होवून बसते व त्यातूनच अपघात घडतात. गतीरोधकाजवळ अपघात होत असल्याने या ठिकाणाहून ये-जा करताना स्थानिक रहीवाशांना जीव मुठीत घेवून वावरावे लागत आहे. या गतीरोधकावर पांढरे पट्टे मारले गेल्यास अपघातांना आळा बसून स्थानिक रहीवाशांनाही दिलासा मिळेल. समस्या संपुष्ठात आणण्यासाठी संबंधितांना सेक्टर १६ मधील रस्त्यावरील गतीरोधकांवर पांढरे पट्टे मारण्याचे निर्देश देण्याची मागणी समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी केली आहे.