नवी मुंबई : स्वच्छता अभियानामध्ये शहरी विभागात नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात प्रथम क्रमाकांचा पुरस्कार प्रभाग ९६ ला गुरूवारी (दि. ७ जानेवारी) नेरूळ विभाग कार्यालयात प्रदान करण्यात आला. महापालिकेचे सहाय्यक आयुक्त तथा नेरूळ विभाग अधिकारी दत्तात्रेय नागरे यांच्या हस्ते नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांना देण्यात आला. सन्मानपत्र व ट्राफी असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या महापालिका स्तरावरील स्वच्छता प्रभाग स्पर्धेत नवी मुंबईमध्ये प्रभाग ९६ ला काही दिवसापूर्वीच जाहीर झाला होता, तो आज वितरीत करण्यात आला. या कार्यक्रमास पालिका प्रशासनाचे स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे, स्वच्छता निरीक्षक जयश्री आढळ, उपस्वच्छता निरीक्षक विरेंद्र पवार यांच्यासह जनसेवक गणेश भगत, गोरक्षनाथ गांडाळ, परविन कौर मॅडम, विशाल जाधव, वैभव जाधव, रमेश नार्वेकर, सागर मोहिते, रवींद्र भगत उपस्थित होते.
प्रभाग ९६ मधील गृहनिर्माण सोसायट्यांना दोन वेळा कचऱ्याचे डब्बे वितरीत करण्यात आले, प्रभागात तीन वेळा स्वच्छता अभियान राबविण्यात आले. विभागात प्रथमच गृहनिर्माण सोसायट्यांचे नामफलक उभारण्यात आले. प्रभागातील अंर्तगत रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले. यातील परिसरात यापूर्वी न झालेल्या परिसरातील रस्त्यांचेही प्रथमच डांबरीकरण झाले. डेब्रिजने भरलेली गटारे वेळोवेळी स्वच्छ करण्यात आली. जनसामान्यांमध्ये स्वच्छतेविषयी वेळावेळी जनजागृती करण्यात आली.
प्रभागातील रस्ते, पदपथ व उद्यानासह, रस्त्यांची दुरावस्था यासह प्र्रभागातील अंर्तगत भागातही रंगरंगोटी व प्रबोधनात्मक सुभाषितांबाबत आग्रही पाठपुरावा गणेश भगत आणि सौ. रुपाली किस्मत भगत यांनी प्र्रशासन दरबारी केला होता. महापालिका अधिकाऱ्यांना घेवून गणेश भगत आणि सौ. रुपाली किस्मत भगत यांनी वेळोवेळी पाहणी अभियान राबवून समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. महापालिका प्रशासनाकडून स्वच्छता प्रभाग स्पर्धेत जाहिर करण्यात आलेल्या निकालामध्ये प्रभाग ९६चा प्रथम क्रमांक जाहिर झाला आहे. हा पुरस्कार गणेश भगत व माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांच्या पाठपुराव्यामुळे व कार्यामुळे प्राप्त झाला असल्याची प्रभागातील रहीवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
या पुरस्काराचे खरे श्रेय विभागातील जनतेचे व सफाई कामगारांचे आहे. स्वच्छता अभियानात सहभागी होताना बकालपणा हटविताना परिसरातील जनतेने मनापासून सहकार्य केलेले आहे. सफाई कामगारांनी सफाई करताना कोठेही कुचराई केली नाही. पुरस्कार आम्ही स्विकारला असला तरी खरे मानकरी प्रभागातील जनता व सफाई कामगारच असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
विभाग अधिकारी कार्यालयात पुरस्कार सोहळा संपल्यावर नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत आणि जनसेवक गणेश भगत यांनी तात्काळ परिसरात जावून कार्यरत असणाऱ्या सर्वच सफाई कामगारांचा सत्कार करत कृतज्ञता व्यक्त केली.