नवी मुंबई : प्रभाग ८६ मधील सारसोळे गाव तसेच नेरूळ सेक्टर सहा परिसरातील बाहेरील व अंर्तगत भागातील गृहनिर्माण सोसायटीच्या संरक्षक भिंतीची रंगरंगोटीकरून त्यावर समाजप्रबोधनात्मक सुभाषिते प्रकाशित करण्याची लेखी मागणी सारसोळे गावचे युवा ग्रामस्थ आणि महापालिका ‘ब’ प्रभाग समितीचे माजी सदस्य मनोज यशवंत मेहेर यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर आणि नेरूळ विभाग अधिकारी दत्तात्रेय नांगरे यांच्याकडे केली आहे.
महापालिका प्रभाग ८६ मध्ये सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहा परिसराचा समावेश होत आहे. स्वच्छ भारत अभियानातंर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२०-२०२१ उपक्रमामध्ये नवी मुंबई शहरात सर्वत्र इमारतींची रंगरंगोटी व त्यावर चित्रे तसेच सुभाषिते रंगविली जात आहे. या अनुषंगाने प्रभाग ८६ मध्ये असलेल्या अंर्तगत भागातील व मुख्य रस्त्यावरील इमारतींच्या संरक्षक भिंतीची रंगरंगोटी प्राधान्याने होणे आवश्यक आहे. आजवर अनेकदा शहरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरातील इमारतींच्या संरक्षक भिंतीची रंगरंगोटी होवून त्यावर चित्रे काढण्यात आली. सुभाषिते काढण्यात आली. परंतु नेरूळ सेक्टर सहामधील साडे बारा टक्केच्या इमारतींच्या संरक्षक भिंतीची आजवर एकदाही रंगरंगोटी करण्यात आलेली नाही. चित्रेही काढण्यात आली नाही. सुभाषिते रंगविण्यात आलेली नाहीत. प्रभाग ८६ मधील साडेबारा टक्केच्या इमारतींच्या संरक्षक भिंतीची रंगरंगोटी का होत नाही. आमचा परिसर स्वच्छ भारत अभियानात मोडत नाही काय? केवळ बाहेरील भागात रंगरंगोटी होते व आतील भागात बकालपणा कायम तसाच असतो. हे चित्र किती वर्ष पाहायचे? स्वच्छ भारत अभियानामध्ये नेरूळ सेक्टर सहामधील व सारसोळे गावातील साडे बारा टक्केच्या इमारती व अन्य इमारतीच्या संरक्षक भिंतीची रंगरंगोटी करण्याचे, त्यावर चित्रे काढण्याचे व सुभाषिते रंगविण्याचे संबंधितांना तातडीने आदेश देण्याची मागणी मनोज यशवंत मेहेर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.