संदीपखांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२०००९६५७३
Navimumbailive.com@gmail.com
– Sandeepkhandgepatil@gmail.com
नवी मुंबई : प्रभाग ८४ मधील नेरूळ सेक्टर ४ परिसरातील नेताजी सुभाषचंद्र बोस उद्यानातील खेळणी तातडीने दुरूस्त करण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
नेरूळ विभाग कार्यालयासमोरच नेरूळ सेक्टर ४ परिसरात महानगरपालिकेचे नेताजी सुभाषचंद्र बोस उद्यान आहे. या उद्यानाच्या सभोवताली सिडकोच्या गृहनिर्माण सोसायट्या आहेत. गेल्या काही महिन्यापासून या उद्यानातील खेळणी तुटलेली आहेत. लहान मुलांच्या घसरगुंडीची दुरावस्था झाली असून झोपाळेही तुटलेले आहेत. याबाबत यापूर्वीही पाठपुरावा करूनही खेळणी दुरूस्त करण्यास महापालिका प्रशासनाकडून चालढकल केली जात आहे. विभाग अधिकाऱी कार्यालयासमोरच हे उद्यान असतानाही तुटलेली खेळणी महापालिका प्रशासनासाठी भूषणावह बाब नाही. सध्या कोरोनाची भीती व प्रभाव कमी झाल्याने मुले उद्यानात मोठ्या संख्येने खेळायला येवू लागली आहे. मुलांना या खेळण्यांचा वापर करता येत नाही. तुटलेल्या खेळण्यांमुळे मुलांची होत असलेली गैरसोय पाहता तात्काळ संबंधितांना खेळणी दुरूस्त करण्याचे निर्देश देण्याची मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.