संदीपखांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२०००९६५७३
Navimumbailive.com@gmail.com
– Sandeepkhandgepatil@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर १८ ए मधील मोकळ्या भुखंडावर फेरीविक्रेत्यांना बसविताना स्थानिक परवानाधारक फेरीविक्रेत्यांना प्रथम संधी देण्याची मागणी जनसेवक गणेश भगत यांनी लेखी निवेदनातून ५ जानेवारी रोजी महापालिका नेरूळ विभाग अधिकारी दत्तात्रेय नांगरे यांच्याकडे केली आहे. स्थानिक परवानाधारक फेरीविक्रेत्यांना प्रथम संधी द्या अन्यथा बाहेरच्या फेरीवाल्यांना हाताला धरून बाहेर काढणार असल्याचा इशारा गणेश भगत यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.
नेरूळ सेक्टर १८ ए येथे महापालिकेचा मोकळा भुखंड मार्केट आहे. या मोकळ्या भुखंडावर परिसरातील फेरीविक्रेत्यांना व्यवसायासाठी बसविण्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाकडून सुरू झालेली आहे. या प्रक्रियेत फेरीविक्रेत्यांना व्यवसायासाठी बसविताना सर्वप्रथम प्रभागातील सेक्टर १६, १६ए, १८, १८ ए, २० आणि २४ मधील परवानाधारक फेरीविक्रेत्यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. स्थानिक भागातील परवानाधारक फेरीवाल्यांना या ठिकाणी व्यवसायासाठी सर्वप्रथम संधी मिळणे आवश्यक आहे, तो त्यांचा हक्कच आहे. स्थानिकांना डावलून अन्य भागातील परवानाधारक फेरीविक्रेत्यांना त्या ठिकाणी संधी मिळाल्यास तो प्रकार खपवून घेतला जाणार नाही. प्रभागातील परवानाधारक फेरीविक्रेत्यांना जागा दिल्यानंतरही जागा उरत असल्यास इतरांना संधी देण्यास हरकत नाही. मात्र स्थानिक परवानाधारक फेरीविक्रेत्यांना प्रवेश न देता इतरांना संधी दिल्यास त्या जागेमध्ये बसविलेल्या बाहेरील फेरीविक्रेत्यांना हाताला धरून बाहेर काढले जाईल व त्या ठिकाणी स्थानिक भागातील परवानाधारक फेरीविक्रेत्यांना व्यवसायासाठी बसविले जाईल. यातून गोंधळ निर्माण झाल्यास अथवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी महापालिका प्रशासन जबाबदार राहील असा इशारा गणेश भगत यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.