नवी मुंबई : कोपरखैराणे, महापालिका प्रभाग ४२ मधील सेक्टर २३ परिसरातील महापालिकेचे शांतीदूत महावीर उद्यान, श्री गुरू तेग बहाद्दूर साहेब उद्यान जनतेसाठी सुरू करण्याची लेखी मागणी समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
कोरोना सुरू झाल्यापासून कोपरखैराणे, महापालिका प्रभाग ४२ मध्ये सेक्टर २३ परिसरात महापालिकेचे शांतीदूत महावीर उद्यान,श्री गुरू तेग बहाद्दूरसाहेब उद्यान बंदच आहे. जवळपास नऊ महिन्याहून अधिक कालावधी लोटला तरी ही उद्याने बंद असल्याने स्थानिक जनतेची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. सध्या कोरोनाची लाट ओसरली असून नवी मुंबई शहरातील जवळपास सर्वच उद्याने महापालिका प्रशासनाने नवी मुंबईकरांसाठी उघडली आहेत. मात्र सेक्टर २३ परिसरात महापालिकेचे शांतीदूत महावीर उद्यान, श्री गुरू तेग बहाद्दूर साहेब उद्यान सुरू करण्यास महापालिका प्रशासनाकडून चालढकलच करण्यात आली आहे. हा परिसर सिडको गृहनिर्माण वसाहतींचा व श्रमिकांच्या चाळीचा आहे. उद्याने बंद असल्याने स्थानिक रहीवाशांची होत असलेली गैरसोय दूर करण्यासाठी ही दोन्ही उद्याने लवकरात लवकर सुरू करण्यासाठी संबंधितांना आदेश देण्याची मागणी समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.