ऐरोली : नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी आरोग्य समिती सभापती अशोक पाटील यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या विविध नागरी कामांचा उदघाटन सोहळा नवी मुंबईचे विकासपर्व व त्यागमूर्ती या नावाने महाराष्ट्रात ओळखल्या जाणारे ऐरोलीचे प्रथम आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते संपन्न झाला.
संदीप नाईक यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या विकास कामांमध्ये १) सेक्टर १४ व १५ मधील सर्व रस्त्यांचे डांबरीकरण करणे. २) स्वामी विवेकानंद उद्यानाचे सुशोभीकरण करणे. ३) सेक्टर १४ मधील संत गाडगेबाबा उद्यानातील विद्युत रोषणाईचा लोकार्पण सोहळा, ४) दिवा सर्कल ते गणेश मंदिर मुख्य रस्त्यालगतच्या पदपथाचे कॉंक्रिटीकरण करणे, ५) सेक्टर १४पोलीस चौकी समोरील कॉर्नरला फाऊंटन(कारंजे) बनवणे, ६) वैतरणा सोसायटी आवारामध्ये डांबरीकरण करणे या कामाचा समावेश आहे.
सदर उद्घाटन प्रसंगी माजी नगरसेविका सौ संगीता पाटील, वार्ड अध्यक्ष कैलास गायकर, समाजसेवक राजेंद्र जोशी, सदानंद दरेकर, राजेश शुक्ला, नामदेव कुंभार, प्रसाद शिंदे, सौ.जया अवरादे, सौ. इंदुमती किंद्रे तसेच वार्ड मधील महिला युवक युवती मोठ्या संख्येने रहिवाशी बंधू-भगिनी उपस्थित होते.